
युनिटी फाउंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त भव्य ‘शिवकन्या सन्मान’ व नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न
नाशिक विभागीय संपादक डॉ. शाम जाधव
नाशिक : आज रोजी युनिटी फाउंडेशनच्या वतीने अध्यक्षा अॅड. एकता कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक अँड.एकता कदम यांना त्यांच्या सहकारी मैत्रिणी अँड विनया नागरे,सौ.स्नेहल लुंगीया , गायत्री भाबरे ह्यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमात ५० महिलांना ‘शिवकन्या सन्मान’ प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच आयोजित नृत्य स्पर्धेत २५ स्पर्धकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.नव-निर्वाचित नगरसेविका अदिती ताई पांडे (प्रभाग १३), प्रमिला ताई मैद ( प्रभाग १७), श्वेता ताई भंडारी ( प्रभाग२१) तसेच रुपाली ताई ननवरे ( प्रभाग १) यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.तसेच सोनाली ताई थोरात, देवयानी ताई आहेर, अविरत सानप, जगदीश निकम, नम्रता पाटील आणि स्त्रीशा पवार यांसारख्या रील स्टार्सनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. आयोजकांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाला मान्यवर आशा मोरे,पाहुण्यांची उपस्थिती लाभली असून त्यांच्या शुभेच्छा व मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली. उपस्थित प्रेक्षकांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.युनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.


