

प्रा. किशोर लहारे यांना राष्ट्रीय पातळीवरील साई जीवन गौरव समाज भूषण पुरस्कार जाहीर
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक शिर्डी. आज रोजी ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार साईबाबांच्या पुण्यभूमी मध्ये दिनांक १० जानेवारी २०२० रोजी भव्य दिव्य स्वरूपात पहिल्यांदाच आयोजन होत आहे. प्रा. किशोर लहारे यांना अशा प्रकारचा राष्ट्रीय पातळीवरील मानाचा, सन्मानाचा व प्रतिष्ठेचा आणि श्रद्धेचा असा हा पुरस्कार जाहीर झाल्याचे श्री सुदाम संसारे सर, अध्यक्ष, पुरस्कार सोहळा समिती, शिर्डी यांनी जाहीर केले आहे प्रा. किशोर लहारे सध्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे गोखले एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीवर्धन येथे अध्ययन व अध्यापनाचे कार्य करत आहेत व ते सध्या महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख व उपप्राचार्य पदावर कार्यरत आहेत. गेल्या ३० वर्षात अध्यापनाचे काम करत असताना प्रा. किशोर सरांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. तसेच, मुंबई विद्यापीठ, मुंबई. विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली. यांच्या अर्थसाह्याने रायगड व श्रीवर्धन तालुक्याच्या इतिहासावर ‘लघुशोध निबंध संशोधन’ करून प्रकाश टाकला आहे, सरांनी २०१४ मध्ये श्रीवर्धन येथे राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय परिषदेचे यशस्वीपणे आयोजन केले होते. अध्यापन करत असताना त्यांनी महाविद्यालयाच्या अनेक विकास मंडळांवर कार्य केले आहे. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून कार्यक्रम अधिकारी म्हणून सुमारे १६ वर्षे समाजसेवे व्रत घेऊन समाज कार्य करणारे असंख्य ‘स्वयंसेवक’ घडविले आहेत. प्रत्येक वर्षी मागास गाव दत्तक घेऊन तेथे नदी बंधारे, वृक्षारोपण, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, आरोग्य शिबिरे, रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे, व्याख्याने यासारखे उपक्रम राबवून एकेकाळी मागास असलेल्या श्रीवर्धन तालुक्यात समाजकार्याच्या माध्यमातून मोठे प्रबोधन व जनजागृतीचे कार्य केले आहे. सरांनी अनेक गरजू मुला मुलींना मदत व प्रोत्साहन देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. तसेच आदिवासीं समाजामध्ये जनजागृती करून त्यांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. मागास व आदिवासी समाज व आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थी असे समाज घटक पुढे येण्यासाठी सरांनी भरपूर मेहनत घेतली आहे, कार्यामुळे त्यांना यापूर्वी रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, गोखले शिक्षण संस्थेचा आदर्श शिक्षक प्राप्त झाले आहे. त्याचेच फळ म्हणून, ओम साई प्रतिष्ठान यांनी विद्यार्थी प्रिय व समाजशील कार्य करणाऱ्या कोकणातील एका शिक्षकाचा गौरव व्हावा या हेतूने, ‘साई जीवन गौरव समाजभूषण पुरस्कार’ घोषीत झाल्याने रायगड व श्रीवर्धन येथे आतापासूनच आनंद व्यक्त करून गोखले महाविद्यालय श्रीवर्धन मध्ये सरांचे सरांचे विद्यार्थी व कर्मचारी व श्रीवर्धन परिसरातून सर्वत्र समाधान व आनंद व्यक्त करण्यात येत आहे.



खुप छान सर.. आपण उत्कृष्ट पत्रकारितेचे धर्म पालन करत आहात. आपण असेच दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नरत rahal! हीच शुभेच्छा!
धन्यवाद सर 😊🙏