
14 वर्षा खालील जिल्हा स्तरीय खो – खो स्पर्धेत प्रथम क्रमांक, श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद
नाशिक प्रतिनिधी – साहिल काकड
नाशिक मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील विध्यार्थी यांनी जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश.13 सप्टेंबर 2025 जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धा नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे पार पडली. या स्पर्धेत नाशिक जिल्हातील 64 शालेय संघाने सहभाग घेतला होता. अंतिम सामना फायनल मखमलाबाद विद्यालय व के बी एच विद्यालय वडाळा यांच्यात झाला. या अटीटती च्या सामन्यात मखमलाबाद च्या संघाने 1 डाव 2 गुणांनी विजय प्राप्त केला. व त्याची निवड पुढील विभागीय खो खो स्पर्धा साठी झाली.या संघांसाठी प्रशिक्षक म्हणून श्री अनिल पगार व व्यवस्थापक श्री शरद आहिरे हे लाभले. संघाला बहुमूल्य प्रशिक्षण साहिल काकड व प्रतीक तिडके यांनी दिले.व संघाला विजया पर्यंत नेले.
खो खो संघ – दिनेश चव्हाण ( कर्णधार ), दर्शन पवार (उप कर्णधार ), अजिंक्य गंगावणे, रुद्र तिडके, अमित देशमुख, पवन अंबोरे, प्रेम ढोले, पारस कातड, ईश्वर देशमुख, साहिल शेंगाडे, अनिकेत पागी, कुणाल जाधव कोच – साहिल काकड, प्रतीक तिडके संपूर्ण टीम चे श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय शिक्षकांनी अभिनंदन व सत्कार केला व पुढील स्पर्धा साठी शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


