
दि. 2ऑगस्ट 2025 शनिवार, रोजी महात्मा गांधी हायस्कूल इगतपुरी येथे, (1995 – 96) बॅच चे तब्बल 29 वर्षानंतर गेट- टुगेदर करण्यात आले. त्याप्रसंगी सर्व आदरणीय शिक्षकांचा, (महात्मा गांधी हायस्कूल चे प्राचार्य) श्री शिंदे सर,(उपप्राचार्य) श्री चौधरी सर,(नूतन शाळेचे प्राचार्य) श्री उफाळे सर, श्री बी डी जोशी सर, श्री अविनाश कुलकर्णी सर, श्री देशपांडे सर, श्री सोनवणे सर आदी गुरुजनांचा शाल,श्रीफळ, गुलाब पुष्प आणि संविधान उद्देशिका देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सर्व गुरुजनांनी दीप प्रज्वलन करून,आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांनी प्रार्थना आणि राष्ट्रगीताने केली .कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन,चारुशीला पवार, कामिनी मार्कंडेय,भूषण पवार, विनायक पाटील, नितीन उगले, संकेत म्हसके, शैलेश गोळे, मंगेश शिरोळे,पवन मालपाणी आणि त्यांचे ईतर सहकारी मित्र यांनी केले.सूत्रसंचालन रेखा बाविस्कर आणि रेखा तिवारी यांनी केले.कार्यक्रमप्रसंगी आपल्या ‘संविधानाची पंचाहत्तरी’ (सुवर्णमहोत्सव) संविधान उद्देशिका फ्रेम सर्वांना देऊन साजरा करण्यात आला.सर्वांसाठी चहा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच माजी विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी पण आपापले मनोगत व्यक्त केले.सर्व मैत्रिणींना एक भेटवस्तू देण्यात आली. शेवटी आभार प्रदर्शन, ॲड.कामिनी मार्कंडेय यांनी केले.मोठ्या संख्येने उपस्थित सर्व माजी विद्यार्थिनी व विद्यार्थी यांच्या मुळे कार्यक्रमाला शोभा आली.सर्व विद्यार्थ्यांनी गुरु भेट, शाळा भेट आणि गळा भेट घेऊन कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला आणि शाळेच्या आपापल्या वर्गात जाऊन फोटो काढले, भरपूर गप्पागोष्टी केल्या आणि कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहात साजरा केला.


