
मालेगाव चे पत्रकार श्री वामन शिंदे यांना महाराष्ट्र जीवन गौरवरत्न पुरस्कार सन्मानित
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक. मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशन व दैनिक भारत नॅशनल चैनल चे उद्घाटन तर्फे दिला जाणारा महाराष्ट्र गौरवरत्न हा राज्यस्तरीय सन्मान यावर्षी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री वामन शिंदे हे सन्मानित करण्यात आले. त्यांनी केलेल्या उल्लखणीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. हा पुरस्कार महंत डॉ श्री भक्तीचरणदास महाराज आखाडा प्रमुख अध्यक्ष ,”कोकण प्रदेश अध्यक्ष -प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र श्री जयप्रकाश पवार सर, मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप काकड, मार्गदर्शक सिंधुबाई काकड, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुनील सिंग परदेशी, जेष्ठ वकील आडवोकेट श्री विलास आंधळे तसेच मायमाऊली न्यूज चे संपादक डॉ. शाम जाधव, हरिभक्त परायण याचे श्री रामभाऊ आवारे , राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ रेखा काकड , राष्ट्रीय युवा अध्यक्ष चि. साहिल काकड, सौ राजनंदिनी आहिरे, वैशाली सकपाळे , डॉ.प्राजक्ता जठार,सौ मेघा शिंपी,रमेश गिरी वंदे महाराष्ट्र न्यूज उपसंपादक नाशिक, सौ कल्पनाताई सोनार, योग गुरु बाळासाहेब मोकळ, संगीता मिसाळ अहिल्यानगर, अँकर अश्विनी पुरी, वामन शिंदे वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी बागलाण सटाणा भास्कर सायमन नेवासा जेष्ठ कवी व चंदन बाफना अहिल्यानगर व मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन सर्व पदाधिकारी आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
श्री वामन शिंदे यांचे मनोगत – नमस्कार मी वामन शिंदे माझे सामाजिक कार्य असे की ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चा मुंबई येथे होणार असून त्यावेळेस मी वामन शिंदे पूर्ण बागलाण तालुक्यात मोटरसायकलीने प्रचार केला त्यावेळेस सटाणा आराई नामपुर संपूर्ण ताराबाद सोमपुर जायखेडा वेगवेगळ्या जागी सर्व समाजांनी सत्कार केला कोरोना काळात गावे बंद होती त्यावेळेस मोफत भाजीपाला वाटप गरीब वस्तीमध्ये पुरणपोळी वाटप केल्या समाजाचं काही लेणं लागतं म्हणून मला महाराष्ट्र राज्य धोबी परीट महासंघ सर्व भाषिक यांच्यातर्फे ही चांगलं काम केल्याबद्दल नियुक्तीपत्र देण्यात आले त्यावेळेस मला श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान तर्फे कोविड योद्धा म्हणून पुरस्कार देण्यात आला जेसी ग्रुप अंतर्गत कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार देण्यात आला तसेच खीरमान येतील एका महिलेला संतती नसून तेथेही मी अग्नी दाग देऊन सर्व कार्य पार पडला तेथील ग्रामपंचायतीने ही सत्कार केला असे माझे सामाजिक काम असून मी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कामही करतो व मला ओझर दहावा मैल येथे हॉटेल पुस्तकांचं एक तळागळात जाऊन पत्रकारिता करतो त्याबद्दल टॉपिक सन्मानपत्र देण्यात आलं नाशिक येथे माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र जीवन गौरव रत्न सन्मानपत्रक व ट्रॉफी देण्यात आली.


