

श्री तीर्थक्षेत्र गजानन महाराज शेगाव डॉ शाम जाधव यांना कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानित
नाशिक प्रतिनिधी – मनीष मुथा
शेगाव आज दिनांक २१/१२/२०२५ रोजी बीएसएफ बहुउद्देशीय संस्था संत कबीर बहुद्देशीय संस्था व संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री क्षेत्र गजानन महाराज शेगाव येथे भूषण सरदार मुख्यआयोजक कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते पुरस्कार विजेत्यांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा गुण गौरव करून सन्मानित करण्यात आले. यामध्ये सहभाग घेणारे २०० मान्यवरांनी सहभाग घेऊन आपला कृती गौरव पुरस्कार सोहळ्या सन्मानित करून एक आगळा वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यामध्ये नाशिकचे मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, मायमाऊली न्यूज संपादक, दैनिक भारत न्यूज संपादक माननीय डॉ शाम जाधव सर यांनाही गुणगौरव करून सन्मानित करण्यात आले. अहमदनगर नेवासा येथील ख्यातनाम कवी साहित्यिक कादंबरीकार श्री भारस्कर सायमन यांनी माननीय डॉ. शाम जाधव सर यांनाही कादंबरी विसाव्याची भाकर देऊन सन्मानित करण्यात आले त्यांच्या कार्याची ही पावती होय नाशिक मध्ये झळकत असून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा सर्वोच्च बहुमान सन्मानित करण्यात आला.


