

योगदर्शन योग केंद्र व तुळजाभवानी मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने श्री तुळजाभवानी मंदिर येथे रथसप्तमी व जागतिक सुर्य नमस्कार दिनाचे औचित्य साधून जनजागृती पर रॅली काढण्यात आली. व नंतर उपस्थित सर्व योग प्रेमी साधकांकडून सूर्यनमस्कार करून घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात आई तुळजाभवानीच्या आरतीने होऊन, गुरुवंदना घेण्यात आली. नंतर रथसप्तमी चे महत्व योगशिक्षिका दिपाली कोठूळे यांनी सांगितले .नंतर सूर्यनमस्कार व त्याचा इतिहास व महत्त्व योगदर्शन केंद्राचे संचालक श्री बाळासाहेब मोकळ यांनी सांगितले व उपस्थित सर्व साधकांकडून मोकळ् यांनी मंत्रासह सूर्यनमस्कार करून घेतले. श्री मोकळ् यांनी यावेळी सूर्यनमस्कार आपलं शारीरिक ,मानसिक आरोग्य चांगले ठेवून आत्म उन्नतीसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले . सूर्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, रोज आपल्या दिनचर्यात सूर्यनमस्कार साधनेचा अभ्यास करण्याचै आव्हान मोकळ यांनी यावेळी केले. कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक जयंत जाचक व सीमाताई ताजणे तसेच मित्रमेळा सं मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ताजने, किशोर जाचक, सामाजिक कार्यकर्ते विलास भाऊ थोरात क्राईम ब्रँचचे मस्कर, कॅप्टन ज्ञानेश्वर राऊत,सुखदेव मोकळ, सुभाष पाटोळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ योगसाधक रमेश भवर, अमान शेख, डॉ. अजित आव्हाड, रूपाली आव्हाड, नितीन महाजन ,गोविंद सर, निदान अनंतवार, वैभव क्षत्रिय, निकेतन मिसाळ श्रद्धा चौधरी अनिता चौधरी ममता कनोजिया तसेच योग शिक्षिका रोहीणी ताई थोरात, दिपाली कोठुळे, मेघा बोडके, नलिनीताई कड, गायत्री मोकळ, माधुरी देवरे, भारती शेट्टी! विजयालक्ष्मी राऊत, लोकेश सोनी, अश्विनी पुरी, यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाला उपस्थित असलेले नवनिर्वाचित नगरसेवक जयंत जाचक व डॉ. सीमाताई ताजने यांचा योगदर्शन योग केंद्राचे संचालक श्री बाळासाहेब मोकळ यांनी सत्कार केला.

मुख्य संपादक -डॉ संदीप काकड


