
तक्षशिला महाविद्यालय आयु. एन बी पगारे साहेब ॲड डॉ. उषा एन.पगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नाशिक प्रतिनिधी – साहिल काकड
तक्षशिला महाविद्यालयात आयु एन.बी.पगारे सेवानिवृत्त नियंत्रण अधिकारी करन्सी नोट प्रेस व ॲड डॉ.उषा एन.पगारे यांच्या उपस्थितीत 26 जानेवारी निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळेस एन बी. पगारे यांनी शाळेला कालकथित कुसुमताई पगारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलांच्या क्रीडा साहित्यासाठी चेक सुपूर्त केला… .ॲड. डॉ .पगारे यांनी यावेळी मुलांना प्रजासत्ताक दिना बद्दलची विशेष माहिती दिली .आज देश हा संविधानावरच चाललेला आहे. तसेच आजचे मुलं हे उद्याचे देशाचे भवितव्य आहे असे त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं.यावेळेस शाळेतील वेगवेगळ्या स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक पांडे सर यांनी आलेल्या मान्यवरांचे सत्कार करून आभार मानले. शालेय समिती अध्यक्ष करुणा सागर पगारे तसेच शाळेची माजी विद्यार्थी व शिक्षकवृंद हजर होते.


