

श्रावण महिन्यात बाल भैरवनाथ महोत्सव संपन्न
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
इगतपुरी. भरविर खुर्द आज दिनांक १७/८/२०२५ बाल भैरवनाथ भंडारा उत्सव वर्ष १३ वे इगतपुरी तालुक्यातील एक छोटेसे खेडे गाव या गावांमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाल भैरवनाथ मंदिरात भंडारा उत्सव साजरा केला जातो श्रावण महिन्यातील तिसरा शनिवार तसेच कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी बाल भैरवनाथ मंदिरात ८ ते १० अभिषेक केला जातो ३ ते ५ मुखवटा मिरवणूक काढली जाते महाप्रसाद व भोजन ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत नंतर जागरण गोंधळ कार्यक्रम रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत चालू असतो तसेच गावातील व मळ्यातील सर्व महिला व पुरुष तरूण व वयोवृद्ध सर्व कार्यक्रमाला उपस्थित असतात तसेच गावातील तरुण मित्रमंडळी कार्यक्रमात सहभागी असतात व कार्यक्रमाची शोभा वाढवतात गावातील पोलिस पाटील रमेश टोचे हे कुठल्याही कार्यक्रमाला हजेरी लावतात कारण त्यांना सर्व गोष्टींची आवड आहे तसेच दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन श्री परसराम बांडे व तानाजी बांडे हे करत असतात शंकर दौंडे भाऊसाहेब बांडे बाळू बांडे काका बांडे नवनाथ बांडे सोमनाथ टोचे हे कार्यक्रमात सहभागी झाले होते तसेच बाहेरील गावातुन आलेले वाघे मुरूळी यांनी त्याची कला दाखवून गावातील गावकऱ्यांचे मनोरंजन केले बाहेरून आलेले गायण पार्टी पाथर्डी आडवाडी कावनई नाशिक रोड घोटी बुद्रुक तंदुरी खेड मंचर पिंपळगाव खांब घोटी वाडी वाडीवरे वडगाव धोंडबार भरवीर बुद्रुक व भरविर खुर्द पोलिस पाटील रमेश टोचे सरपंच रामभाऊ सारूक्ते विकास कोकणे रामदास टोचे दत्ता पुंडे व सर्व गावकरी व पंचक्रोशीतील लहान थोर सहभागी झाले होते.
कार्यकारी संपादक – श्री मनिष मुथा


