
बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली
प्रतिनिधी – संपादक डॉ शाम जाधव
सांगली. बौद्ध धम्मा संस्कार संघ श्रावस्ती विहार येथे दिनांक १७/८/२०२५ रोजी रविवारी सकाळी ११:०० वाजता प्रमुख पाहुणे डॉक्टर किशोर वाळूंजे ,मुंबई युनिव्हर्सिटी आणि माजी नगरसेविका शेवंता ताई वाघमारे यांच्या हस्ते आपले आदर्श महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि परम पूज्य बोधी सत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शाची धूप, दीप, पुष्प यांनी पूजन करून त्रि -सरण आणि पंचशील ग्रहण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक आणि स्वागत विहाराचे माजी सचिव आयुष्यमान प्राध्यापक अशोक भटकर यांनी केले. आयु. शेवंता ताई वाघमारे माजी नगरसेविका यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे ऍड. डॉ. किशोर वाळुंजे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आयु. सखाराम खरटमोल यांचा सत्कार आयु. जगन्नाथ आठवले यांनी केला आयु.ऍड. प्रमोद कटाने याचा सत्कार आयु. पवन वाघमारे यांनी केला. त्यानंतर प्रमुख पाहुणे वाळुंजे यांनी तथागत भगवान बुद्ध यांचे मनाचे तत्त्वज्ञान आणि परदेशी उच्च शिक्षण याचे महत्त्व आणि उपयोगिता याबाबत सविस्तर धम्मदेशना दिली.सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे आभार विहाराचे सह खजिनदार जगन्नाथ आठवले साहेब यांनी मानले.धम्म पालन गाथा संपन्न होउन कार्यक्रमाची सांगता झाली.सदर कार्यक्रमांस आयु.संजय घाडगे सर संचालक संचालिका आयु.. दीपमाला कांबळे,ऍड. सिद्धार्थ काकडे,ऍड.साबळे सर, ऍड. सन्मित्र भटकर, माळाप्पा कदम, जनार्दन जयकर, जेष्ठ समाजसेविका आयु., संगीताताई शिंदे, अमर कांबळे, निखिल आठवले, आनंदा कवठेकर, इत्यादी अनेक उपासक उपासिका उपस्थित होते.

कार्यकारी संपादक – श्री मनिष मुथा


