

*”एक भेट नव्या तंत्रज्ञान शिक्षणाची”*
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
मुंबई आज रोजी स्थित सायन (पुर्व) तील सायन काळा किल्ला जवळील जोगळेकरवाडी म्युनिसिपल शाळा संकुलमधील सुप्रसिध्द ज्ञानविकास नाईट हायस्कुल मध्येपरिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या श्रमिक, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर नव्या तंत्रज्ञानाची जोड मिळावी, यासाठी प्रिन्सिपल भगवान परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील लोकप्रिय स्टेट बँक ऑफ इंडिया टीम तर्फे दहा संगणक संच आणि एक छपाई मशीन भेट देण्यात आले. ह्याप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडिया च्या व्यवसाय आणि परिचालन विभागाचे उप महाप्रबंधक आयु. अजित कुमार सर, मानव संसाधन आणि प्रशासन विभागाच्या मुख्य प्रबंधक छाया फर्नांडिस मॅडम आणि सायन झोनल प्रमुख प्रबंधक मंगेश गवारे सर यांच्या हस्ते दहा संगणक संच, एक छपाई मशीन ज्ञानविकास नाईट हायस्कुल चे प्रिन्सिपल भगवान परदेशी सरांना सुपुर्द केले. तसेच, वर्ष २०२५-२६ मधील रात्रशाळेमधील विद्यार्थी विद्यार्थिंनींना अल्पोपहार म्हणून कॅडबरी चॉकलेट संच व उत्कृष्ट लेखनासाठी पेन देऊ करण्यात आले तर माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी, विद्यार्थी समुपदेशक जितेंद्र कांबळे गुरुजी यांनी समालोचन केले. ह्यावेळी मासूम संस्थेचे गणित विषयतज्ञ अजित केमनाईक सर, मासूम संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजर प्रियंका जाधव मॅडम, धारावीतील युनिव्हर्सल नाईट हायस्कुल चे प्रिन्सिपल राजू सोनावणे ह्याप्रसंगी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे अजित कुमार यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले आणि सामाजिक दायित्व करण्याची संधी दिल्याबद्दल रात्रशाळेतील शिक्षकांसह सहकारी अधिकारी छाया फर्नांडिस मॅडम आणि मंगेश गवारे सरांचे आभार मानत कौतुकही केले.शेवटी प्रिन्सिपल भगवान परदेशी सरांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ बहाल करत आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.सध्या आधुनिक काळातील शालेय शिक्षणासह नव्या संगणकीय तंत्रज्ञानयुक्त ज्ञान मिळणे, हि काळाची गरज ओळखून ज्ञानविकास नाईट हायस्कुल सारख्या श्रमिक वर्गामध्ये शिक्षणाची ऊर्जा देणाऱ्या दुर्लक्षित नाईट हायस्कुल मध्ये अशा विविध प्रगतशील उपक्रम राबविण्यासाठी निस्वार्थी दानशूर व्यक्तीसह संस्थाची आवश्यकता आधुनिक काळात नवी शैक्षणिक प्रगतीकारक ठरेल.


