

महंत श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव यांना महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान…
नाशिक प्रतिनिधी – श्री मनिष मुथा
.नुकत्याच नासिक येथे पार पडलेल्या मायमाऊली न्युज चॅनल, व मायमाऊली शिवशक्ती फाऊंडेशन (राष्ट्रीय संस्था) यांच्या वतीने दिला जानारा अत्यंत प्रतिष्ठेचा व नामांकित पुरस्कार सोहळा नासिक येथे मोठ्या दिमाखात व उत्साहात संपन्न झाला. यावेळी दैनिक भारत नॅशनल न्यूज चॅनेल चा उदघाटन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ श्री संदीप काकड, राष्ट्रीय युवा अध्यक्ष साहिल काकड, डाॅ शाम जाधव,(कोअर कमिटी) श्री मनीष मुथा(कोअर कमिटी)महंत श्री भक्तीचरणदास महाराज(कुंभमेळा आखाडा अध्यक्ष) कार्यक्रम अध्यक्ष श्री जय प्रकाश पवार जेष्ठ पत्रकार व कोकण जिल्हा अध्यक्ष , कमगार न्यायालय जेष्ठ वकील श्री विलास आंधळे, के पी एम फौंडेशन अध्यक्ष श्री सुनिलसिंग परदेशीं, बांधकाम व्यावसायिक श्री विनय कर्नावत , संस्था मार्गदर्शक श्रीमती सिंधूबाई काकड व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी महंत गोपालव्यास सत्कारास उत्तर देतांना म्हणाले संत,महंत,तथा संन्यासी वर्ग हे भगवंताला निस्वार्थपने शरण गेलेले असतात. जसे की श्रीमद्भगीते श्री गोपालकृष्ण महाराज म्हणतात कर्मण्येविधिकारस्ते, मा फलेषु कदाचन॥मा कर्म फलहेतुभुर्मा,ते संड्गोऽस्त्वकर्मणी॥ कुठल्याही कर्म फळाची अपेक्षा न ठेवता अपेक्षारहीत कर्म करीत राहाने परंतु समाजामधे आज अनेक संत मंडळी फलेच्छारहीत अध्यात्मिक तथा सामाजिक क्षेत्रात काम करतांना दीसत आहे परंतू ह्या क्षेत्रात काम करीत असतांना सामाजिकमान्यतेचा तथा समाजातील अशा ज्या संस्था,समीत्या,फाउंडेशन,इत्यादी प्रकारच्या क्षेत्रामार्फत दील्या जानारे पुरस्कार तथा मान सन्मान,व समाजाचा तथा लोकभावनांचा विचार करता अशा स्वरूपाचे पुरस्कार तथा मान सन्मान स्वीकारावयास हरकत नाही. म्हणून मी हा पुरस्कार सामाजिक बांधीलकी व लोकमान्यतेला पावन झालेला मान सन्मान स्वीकारून श्रीकृष्ण भगवंताच्या चरणी अर्पण करतो दंडवत प्रणाम. यावेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठीकानाहून आलेल्या पुरस्कारीर्थी नी टाळ्यांच्या गजरात संस्थेच्या तथा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकार्यांचे अभिनंदन व धन्यवाद दीले कार्यक्रम मोठ्या दिमाखात व उत्साहात संपन्न झाला.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


