
मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन तर्फे गोदाई सेवकांचा गोदासेवा पुरस्कार देऊन सन्मान.
नाशिक – उपसंपादक साहिल काकड
दिनांक 28/12/2025 रविवार रोजी मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन तर्फे गोदावरी स्वच्छता स्वयंसेवकांचा गोदासेवा पुरस्कार सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.नाशिक येथील पंचवटी गोदावरी नदी स्वच्छता साठी प्रत्येक रविवारी सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत वेळ देऊन नदी परिसर स्वच्छ करणारे गोदाई सेवक बहुउद्देशीय संस्था चे अध्यक्ष व त्यातील सदस्य हे आपल्या दैनंदिन जीवनातील कामे, नोकरी, व्यवसाय, घराची जवाबदारी सांभाळून महिला व पुरुष हे निसर्गाची सेवा जोपसण्याच्या उद्देशाने पंचवटी येथील गोदावरी नदी व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याचे निःस्वार्थ कार्य व निष्ठा पाहुण त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन (राष्ट्रीय संस्था ) च्या वतीने गोदासेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्था च्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ संदीप काकड, राज्य अध्यक्षा सौ राजनंदिनी आहिरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ शाम जाधव उपस्थित होते.
पुरस्कार्थी याप्रमाणे. गोदाई सेवक बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित १९२ व्या गोदा स्वच्छता कार्यक्रमाला उपस्थित श्री दीपक पाटील, श्री सुभाष कुलकर्णी, श्री श्याम जन्नावर, श्री गणेश वैश्य, सौ रश्मीताई भोसले, श्री चंद्रकांत महाले, सौ जयश्री दांडगे, श्री योगेश दांडगे, सौ वंदना शिंपी, सौ रेखा जन्नावार, जोशी ताई, सौ मीरा महाजन, सौ मनीषा कमरे, श्री दिनेश कुमावत, सौ मनीषा मोरे, सौ संगीता मोरे, राधाबाई भदाणे, सौ सविता गोरे, सौ छाया खैरनार, आशा टाळकोटे यांचे बरोबर अनेक नवीन गोदासेवक उपस्थित होते.
मायमाऊली न्यूज उपसंपादक – साहिल काकड


