

सुचेता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत समुपदेशन कोर्सचे सर्टिफिकेट वाटप करण्यात आले.
नाशिक प्रतिनिधी – साहिल काकड
सुचेता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत रोजगार निर्मिती करणे तसेच समुपदेशन काळाची गरज म्हणून समुपदेशन कोर्स चालवला जातो. या कोर्समध्ये वकील व गृहिणींनी भाग घेऊन तीन कोर्स पूर्ण केला या कोर्समध्ये एकूण दहा टॉपिक वरती शेषन घेतले गेले. यामध्ये व्यक्तिमत्व विकास, ताण तणाव समुपदेशन, विद्यार्थी समुपदेशन, पालक समुपदेशन, विवाहपूर्व विवाह नंतरचे समुपदेशन ,ध्येय निश्चिती, वेळ व्यवस्थापन समुपदेशन, व्यसनसल्ला व उपचार समुपदेशन, करियर समुपदेशन , नातेसंबंध समुपदेशन असे एकूण दहा टॉपिक वर ऑनलाईन शिकवले गेले. समुपदेशन काळाची गरज झालेली आहे.कोर्स यशस्वीरित्या करण्यासाठी सुचेता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष ॲड डॉ उषा एन पगारे आणि उपाध्यक्ष नंदिनी जाधव मॅडम यांनी कोर्सचे सर्टिफिकेट वाटप डी वाय एस पी कमलाकर जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वकील व गृहिणींनी वाटप करण्यात आले..तसेच जाधव सर, नंदिनी जाधव मॅडम समोगेशन पर मार्गदर्शन केले, ॲड डॉ उषा एन. पगारे यांनी आभार मानले.


