
निसर्गराजा ग्रुप संस्था (माणकापूर) तर्फे श्री मनीष मुथा यांना राष्ट्रीय जीवन गौरव -प्रेरणा पुरस्कार जाहीर.
नाशिक प्रतिनिधी – डॉ शाम जाधव
बेळगाव – निसर्गराजाग्रुप माणकापूरच्या वतीने खास महाशिवरात्री, शिवजयंती व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल “राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा” व निमंत्रित कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक चे प्रसिद्ध पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री मनीष मुथा यांना राष्ट्रीय उत्कृष्ट पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार 2026 प्रधान करण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे. पुरस्कार सोहळा आयोजक निसर्गराजा ग्रुप संस्था अध्यक्ष श्री शिवाजी येडवान- दैनिक महासत्ता वार्ताहर; अध्यक्ष- निसर्गराजाग्रुप माणकापूर ता. निपाणी जि. बेळगाव (कर्नाटक राज्य)
मायमाऊली न्यूज – मुख्य संपादक


