

भरविर खुर्द येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
इगतपुरी भरवीर खुर्द आज दिनांक १५ /७/२०२५ रोजी बालभैरवनाथ फाऊंडेशन भरविर खुर्द व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५च्या अनुषंगाने भरविर खुर्द ता.इगतपुरी. जिल्हा परिषदेच्या इयत्ता १ ली ते ७ वी व हायस्कूलच्या इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी बहुविध सेवासंघ देवबांध ता.मोखाडा जि.पालघर या संस्थेकडून प्राप्त लेखन साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक श्री.दिपक पराये साहेब होते. प्रतिमा पूजन व दीप पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालभैरवनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.तुकाराम सारुक्तेसर यांनी केले.सन २०१८ पासून तर आजपर्यंत सलग ८ वर्षांपासून फाऊंडेशन भरविरखुर्द गांवातील विद्यार्थ्यांना दरवर्षी विविध संस्थांच्या माध्यमातून मोफत लेखनसाहित्याचे वाटप करत असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. सहायक निबंधक कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री.पराये सर यांनी सहकाराचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व असून अगदी बालवयापासून ही वृत्ती जोपासली गेली पाहिजे असे प्रतिपादन केले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भावी अधिकारी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आभारप्रदर्शनानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच सहायक निबंधक कार्यालयातर्फे सर्व विद्यार्थ्यांना भगवदगीता व बिस्किटचा पुडा देण्यात आला.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्रीमती वैशाली वालझाडे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री.दिपक परायेसाहेब सहायक निबंधक सहकारी संस्था इगतपुरी,श्री.संजय गायकवाड साहेब सहकार अधिकारी सहायक निबंधक कार्यालय इगतपुरी, श्रीमती स्वप्नाली शिंदे मॅडम कार्यालयीन अधिक्षक सहायक निबंधक कार्यालय इगतपुरी,श्री.रमेश टोचे पोलिसपाटील भरविर खुर्द,श्री.तुकाराम सारुक्तेसर अध्यक्ष बालभैरवनाथ फाऊंडेशन भरविर खुर्द,श्री.प्रभाकर कोकणे उपाध्यक्ष बालभैरवनाथ फाऊंडेशन भरविर खुर्द,श्री.दिलीप टोचे संचालक बालभैरवनाथ फाऊंडेशन भरविर खुर्द,श्री.भास्कर सारुक्ते पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते भरविर खुर्द हे आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूल भरविर खुर्द या दोनही शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.


