
ऍड. उषा. एन पगारे ( नाशिक जिल्हा न्यायालय ) यांची ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार पदी नियुक्ती.
नाशिक प्रतिनिधी- डॉ शाम जाधव
दि 13 जुलै 2025 नाशिक येथे ऍड. उषा. एन पगारे ( नाशिक जिल्हा न्यायालय ) यांची ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे अनेक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. ऍड उषा पगारे या कायदेशीर क्षेत्रात कार्यरत असून उल्लेखनीय कार्य करीत आहे त्यासोबत त्या सामाजिक क्षेत्रात हि उल्लेखनीय कार्य करीत आहे. त्यासोबत समुपदेशन केंद्र हि चालवतात व आधार आश्रम, बालश्रम, वृद्धाश्रम, कॉलेज ई ठिकाणी त्या सेवा करीत असतात. अनेक सामाजिक संस्था वर पदाधिकारी म्हणून त्या कार्यरत आहे तसेच विशाखा समिती वर पण सल्लागार पदी कार्यरत आहे. व सदैव सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असतात.
मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन या संस्था च्या कायदेशीर सल्लगार पदी कार्यरत असून संस्थापक अध्यक्ष व सर्व कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या कडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


