


*पंचवटी विभाग नागरी संरक्षण प्राथमिक पाठ्यक्रमाचा समारोप*
नाशिक प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दल नाशिक पंचवटी विभागातर्फे आडगाव येथील श्री चंद्र मौलेश्वर सभागृहात दि.१५ ते २१ जुलै दरम्यान देशात अचानक येणाऱ्या युद्धजन्य आणि आपत्कालीन परिस्थिती तसेच आगामी काळात होणाऱ्या नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी विभागीय क्षेत्ररक्षक मनोहर जगताप यांनी नागरी संरक्षण मूलभूत प्राथमिक पाठ्यक्रमाचे आयोजन केले होते. यात नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन, आग नियंत्रण,प्रथमोपचार,हवाई हल्ला, विमोचन तसेच बॉम्ब हल्ला,आधुनिक युद्ध तंत्रज्ञान विषयांवर उपनियंत्रक अतुल जगताप,पंचवटी विभागीय क्षेत्ररक्षक मनोहर जगताप यांनी एकूण पाच दिवस प्रात्यक्षिक सहित मार्गदर्शन केले.आज समारोप प्रसंगी आडगाव पोलिस निरीक्षक संजय भिसे यांनी आपत्कालीन स्थितीत नागरी संरक्षण दलाची महत्त्वाची भूमिका असते असे मार्गदर्शन केले तसेच माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी आगामी होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी विभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षण घेऊन कार्य करावे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपनियंत्रक अतुल जगताप यांनी राष्ट्रहितासाठी कार्य करण्याची संधी आपणास नागरी संरक्षण दलात भरती होत करता येईल आणि आपत्ती काळात आपण स्वतः चे आणि इतरांचे संरक्षणकरू शकतात असे मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आडगाव पोलीस निरीक्षक संजय पिसे, माजी नगरसेवक उद्धव निमसे, नागरी संरक्षण माजी मुख्य क्षेत्ररक्षक डॉ सुभाष काळे, भद्रकाली विभागीय क्षेत्ररक्षिका मंगला काकड,अंबड विभागीय क्षेत्ररक्षक योगेंद्र पाटील,पंचवटी विभागीय क्षेत्ररक्षक मनोहर जगताप, देवळाली कॅम्प विभागीय क्षेत्ररक्षक भूपेंद्र जाधव, सातपूर विभागीय क्षेत्ररक्षक शुभम क्षीरसागर, स्वयंसेवक आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनोहर जगताप आणि आभार अशोक चौधरी यांनी मानले.



