

सेवक कामगार संघटना आणि सेवक लोकहित फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
मिरज. आज दिनांक १/८/२०२५ रोजी”दुःख पचवून, अन्याय झेलून, नव्या स्वप्नांची मशाल पेटवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, सेवक कामगार संघटना आणि सेवक लोकहित फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती सामाजिक भान जपत साजरी करण्यात आली.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटपसंघटनांचे सामूहिक पाऊल समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी…जयंतीच्या निमित्ताने नाचगाणे, सत्कार वा भाषण याऐवजी एका अर्थपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मिरज येथील मनपा उर्दू शाळा क्रमांक २३ येथे महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणाची वाटचाल ही साध्या वह्या-पेनमधूनही सुरू होऊ शकते आणि स्वप्नांची भरारी घेऊ शकते, हे या उपक्रमाने पुन्हा सिद्ध केलं. शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वी विद्यार्थी –उमेरा फिरोज ढोले,इकरा सलीम खतीब,तसकीन जुनेद शेख,अवेस राहील शेख या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली. या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देताना त्यांच्या डोळ्यात नव्या आशेची, स्वप्नांची आणि जिद्दीची चमक दिसत होती. त्यांच्या छोट्याशा पावलांमध्ये भविष्यातील मोठी पावले लपलेली आहेत, याची जाणीव यावेळी सर्वांना झाली. कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमरफारूक ककमरी यांनी सांगितले की,”महापुरुषांची जयंती साजरी करायची असेल तर त्यांच्या विचारांचं वांग्मय हातात घेऊन, त्यांच्या कृतींचं अनुकरण करून समाजात परिवर्तन घडवणं ही खरी मानवंदना आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने अनेक वंचितांना आवाज दिला, त्यांचं शब्दरूप हे हजारो गरिबांचं हक्काचं शस्त्र ठरलं, त्यांची जयंती म्हणजेच नव्या पिढीला संघर्षाची आणि शिक्षणाची प्रेरणा देण्याची संधी आहे.”शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं “लिहित रहा, वाचत रहा, लढत रहा – कारण आपल्या शब्दांमध्येच आपलं भविष्य घडतं.”त्यांनी आपल्या मत मांडताणा शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यावर भर दिला. उपस्थित पालक आणि विद्यार्थी यांच्यात प्रेरणा निर्माण करणारी ऊर्जा या कार्यक्रमात होती.हा उपक्रम एक दिवसापुरता मर्यादित नसून, समाजघडणीसाठी चाललेल्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. सेवक कामगार संघटना आणि सेवक लोकहित फाउंडेशन हे पुढील काळातही शिक्षण, आरोग्य, आणि न्याय या क्षेत्रांत कार्यरत राहतील. या उपक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली, जसे —प्रशांत कदम (संचालक) कादरबाशा बागवान (मिरज शहराध्यक्ष),श्रावण घोलप,शशिर भोसले,बुरान मुजावर,रमजान मुल्ला,जमीर बगारे,फिरोज ढोले
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


