

कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फौंडेशन ची पंचवटी व म्हसरूळ विभागीय आढावा बैठक संपन्न
नाशिक प्रतिनिधी दि. 2 ऑगस्ट 2025 रोजी नाशिक येथे कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुनिलसिंह परदेशी, यांचे अध्यक्षतेखाली पंचवटी व म्हसरूळ विभागात आढावा बैठक परशुराम हॉल, तारवाला नगर मेरी येथे घेण्यात आली.यावेळी परीसरातील उपस्थित पदाधिकारींना येणाऱ्या सिंहस्थासाठी संस्थेच्या माध्यमातून पोलिस प्रशासनासोबत व प्रशासकीय अधिकारी यांचे समवेत काम करण्यासाठी अनेक आवश्यक ती कामे करण्या बाबत मार्गदर्शन केले तसेच संस्थेच्या कार्याची सखोल माहिती देण्यात आली आहे. संस्था तर्फ अनेक प्रोजेक्ट वर काम करण्यात येणार आहे त्याबद्दल सदस्य यांना माहिती देण्यात आली. त्यासोबत फौंडेशन चे राष्ट्रीय सचिव श्री राजेंद्र आहेर यांनी पदाधिकारी यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. तसेच अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. नवीन पदाधिकारी यांना आयडी कार्ड देण्यात आले. तसेच संस्थेच्या लोकांना सिंहस्थ कुंभमेळ्यात रोजगार उपलब्ध करून देणे संबंधात मार्गदर्शन करण्यात आले. उत्कृष्टपणे मिटींग संपन्न झाली. सदर मिटींगसाठी उपस्थित पदाधिकारी राष्ट्रीय सचिव श्री राजेन्द्र आहेर, राष्ट्रीय डायरेक्टर श्री संदीप काकड, सौ. रोहिणी ताई कुमावत, श्री अमोल कदम सर सौ. रेखा संदिप काकड अमिता जाधव , पुनम मालुसरे , सुनिता जाधव वर्षा राजपुत, प्रमिला कुंभार, अंजली शिंदे, निकिता पवार, मनिष देशमुख, प्रशांत सूर्यवंशी, जयवंत देशमुख, शेखर ढेपे,देविदास जगताप , अविनाश पवार, भाऊसाहेब आंबेकर, सुजल कंसारा ई पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थित सर्व पदाधिकारी यांना कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फौंडेशन तर्फ सर्वाना शपथ देण्यात आली.संस्था चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुनिलभाऊ परदेशीं यांनी उपस्थित पदाधिकारी व शेखर ढेपे व माजी नगरसेवक जगदीश भाऊ पाटील यांचे हॉल उपलब्ध करून दिल्या बद्दल आभार व्यक्त केले.व मिटिंग संपन्न केली.
मायमाऊली न्यूज मुख्य संपादक – डॉ संदीप काकड




