

१७ ऑगस्ट ऐतिहासिक दिवस…! निमित्त राष्ट्रसंत स्वच्छतेचे जनक गाडगे बाबांच्या पुण्यपावन भुमी अमरावती मध्ये समाज क्रांती पुरस्कार…..!
महाराष्ट्र प्रतिनिधी – संपादक डॉ शाम जाधव
अन् संपूर्ण महाराष्ट्रात होणार एकच भुषणावह चर्चा…. भुषण सरदार….! ब्रॅड अमरावतीचा…! गौरव महाराष्ट्राचा…..!
तीन चार महिण्यापासून…. एका ध्येयांने वेडा पिसा झालेला २६ वर्षे वयाचा तरुण…
यास सबंध विश्वाला ज्यांनी स्वच्छतेचा महामंत्र दिला… अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता यावर जनप्रबोधन केले… समाजाचे उत्खनन करून समाजप्रबोधन करून जागृती केली. असे महान संतश्रेष्ठ आदरणीय गाडगेबाबा च्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहूमहाराज, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई लोकशाहीर आण्णाभाऊ, राष्ट्रसंत कबीर महाराज अशा विविध राष्ट्रपुरुषांच्या… विचाराने प्रेरीत होऊन… अत्यंत अल्प वयात… अगदीच तारुण्यांच्या उबंरठ्यावर पदार्पण करीत असतांनाच… सामाजिक कार्यात पडलेले……. महाराष्ट्राचे भुषण… !
अर्थात अमरावतीचा हिरो… ! भुषण सरदार सर….!
संपुर्ण विदर्भात आपल्या कार्याचा झंझावात सुरु करून . आत्महत्या ग्रस्त शेतकर्याच्या मुलापासून अंध, अंपग ( दिव्यांग ) विधवा, परितक्या, शोषित, पिडीत, असलेल्या वंचित असलेल्या उपेक्षितांना न्याय देण्यासाठी सदैव तत्पर असणारा हा जागरूक नायक आज दि.१६ ऑगस्ट च्या रात्री संपूर्ण महाराष्ट्राने कृतीतून अनुभवलाय…
निमित्… समाज क्रांती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन… या कार्यक्रमासाठी येत असलेले महाराष्ट्रातून मान्यवर….
महराष्ट्रात अनेक पुरस्कार सोहळे होतात… हा मात्र सोहळा माणुसकीचा….! तितकाच आपुलकीचा गौरवशाली ठरणार आहे… प्रवासात बस, ट्रेन मध्ये जागा मिळाली का? अशी आस्थेने चौकशी करण्यापासून रात्री रेल्वे स्टेशनबाहेर १ वाजता वाट पहात असणारे भुषण सरदार व त्यांची संपूर्ण टिम स्वागतासाठी सज्ज….!
स्वच्छ सुंदर अमरावती नगरी….
भगवान विष्णुची अमरावती…
गाडगेबाबांची…पवित्र ‘ स्वच्छ भुमी…
स्वागत झाले… प्रत्येकांची आस्थेने चौकशी करून रिक्षाने निवासस्थानी सर्व संपन्न सोयी सुविधा उपलब्ध करून…
पुन्हा सकाळी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज होण्याकरीता… तास दोन तासाच्या आरामा करीता घरी जाणारा दक्ष….
नायक…..
💐💐💐💐🌹🌹🌹
गर्व आणि अभिमान आहे….🙏💐


मुख्य संपादक – डॉ संदीप काकड
कार्यकारी संपादक – श्री मनिष मुथा


