
लेखक व साहित्यिक भास्कर सायमन समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
नाशिक प्रतिनिधी – संपादक डॉ शाम जाधव
अमरावती दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. बी एस एफ बहुउद्देशीय संस्था अमरावती उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विध्यमानाने आयोजित साजक्रांती पुरस्कार सोहळ्यात लेखक व साहित्यिक म्हणून नावलौकिक असलेले श्री भास्कर सायमन यांना समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक फिल्म स्टार, रील स्टार, निर्माते दिग्दर्शक, अभिनेता अभिनेत्री यांच्या उपस्थिती मध्ये व संस्थापक अध्यक्ष भूषण सरदार यांच्या वतिने हा पुरस्कार प्रधान करण्यात आला.१७ ऑगस्ट ऐतिहासिक दिवस…! निमित्त राष्ट्रसंत स्वच्छतेचे जनक गाडगे बाबांच्या पुण्यपावन भुमी अमरावती मध्ये समाज क्रांती पुरस्कार सोहळा पार पडलायास सबंध विश्वाला ज्यांनी स्वच्छतेचा महामंत्र दिला… अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता यावर जनप्रबोधन केले… समाजाचे उत्खनन करून समाजप्रबोधन करून जागृती केली. असे महान संतश्रेष्ठ आदरणीय गाडगेबाबा च्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहूमहाराज, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई लोकशाहीर आण्णाभाऊ, राष्ट्रसंत कबीर महाराज अशा विविध राष्ट्रपुरुषांच्या पावन राष्ट्रात हा सोहळा संपन्न झाला.

कार्यकारी संपादक – श्री मनिष मुथा


