

बी एस एफ बहुउद्देशीय संस्था, उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय समाजक्रांती पुरस्कार सोहळा अमरावती येथे संपन्न
नाशिक प्रतिनिधी – डॉ संदीप काकड
बी एस एफ बहुद्देशीय संस्था अमरावती, उपेक्षित नायक न्यूज व सत कबीर बहुद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील होटल यश पॅलेस या ठिकाणी समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष वैशाली सोनवणे ( नाशिक ) या होत्या तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख, निर्माता नंदकिशोर धकिटे, दिग्दर्शक प्यारेलाला शर्मा, निर्माता नानासाहेब बच्छाव, मॉडेल व ज्यूरी आरती बारवसे, अभिनेता योगेश पवार, मॉडेल सावी वासनिक, समाज सेवक निलकंठ सरदार, डॉ चंद्रशेखर गवळी, शाळा संचालक नितीन डांगळे, वैध मापन शास्त्र अधिकारी रुपचंद फुलझेले, समाज सेविका किरण पिंजवानी, समाज सेविका आम्रपाली चौधरी, समाज सेवक शंकर आहुजा, अभिनेता सुरज मानकर इत्यादी होते. पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील 150 लोकांना समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नंदकिशोर धकिटे निर्मित व अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शीत ऍट पोस्ट बिहाली या हिंदी मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले. तसेचं मॉडेल आरती बारवसे व पत्रकार भूषण सरदार आयोजित फॅशन शो पोस्टर लाँच करण्यात आले.कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भूषण नि सरदार असून सह आयोजक ऍड शितल गजभिये, राजेंद्र हेलोडे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका नाशिक अश्विनी सांगळे यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले आणि आभार दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी मानले. पुरस्कार सोहळ्याला सम्पूर्ण महाराष्ट्रातून 200 लोकांची उपस्थिती होती. अगदी भव्य दिव्य हा पुरस्कार सोहळा अमरावती येथे अविस्मरणीय स्वरूपाचा झाला.


मुख्य संपादक – डॉ संदीप काकड , संपादक – डॉ शाम जाधव, कार्यकारी संपादक – श्री मनिष मुथा


