

बागलाण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली सोनवणे राज्यस्तरीय समाज क्रांती पुरस्कार सोहळा 2025 च्या अध्यक्षस्थानी


नाशिक प्रतिनिधी – डॉ संदीप काकड
बीएसएफ बहुउद्देशीय संस्था अमरावती, उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या समाजक्रांती पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान बागलाण तालुका येथील वैशाली सोनवणे यांनी भूषविले. व समाजक्रांती पुरस्कार ने त्या सन्मानित हि करण्यात आले. ह्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजक सन्माननीय भूषण सरदार, आर्यमेघ सरदार, ऍड.शितल गजभिये, राजेंद्र हेलोडे, अश्विनी सांगळे, डॉ संदीप काकड, रामभाऊ आवारे, डॉ शाम जाधव, राजनंदिनी आहिरे, अर्चना वैद्य ई. यांनी या सोहळ्याचे अतिशय सुंदर असे नियोजन केलेले होते. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ 150 लोकांना समाजक्रांती पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, साहित्यक्षेत्र, विविध फिल्म कलाकार, रील स्टार, प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते, विविध न्यूज चैनलचे संपादक, अशा अनेक विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजक सन्मा.भूषण सरदार यांनी भविष्यात आपण यापेक्षाही चांगल्या पद्धतीचे पुरस्कार सोहळे आयोजित करू त्यासाठी सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात सन्मा. वैशाली सोनवणे यांनी भूषण सरदार, आर्यमेघ सरदार व संपूर्ण आयोजक टीम यांनी अतिशय सुंदर असे नियोजन केले त्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिलेले आहेत परंतु भूषण सरदार यांनी येणाऱ्या पुरस्कारार्थींची जी काळजी घेतली ती कुठेही पाहायला मिळाली नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. अतीशय सुंदर अशी ट्रॉफी व सन्मानपत्र पुरस्कारार्थींना देण्यात आले.

संपादक – डॉ शाम जाधव


