
आवाज लेखणीचा राज्यस्तरीय काव्य संमेलन २१ रोजी नाशिक नगरीत
नाशिक प्रतिनिधी – डॉ. शाम जाधव
साहित्यिक शब्दशुर पुरस्कार , सत्यशोधक पत्रकार पुरस्कार, समाजसेवक व साहित्यिकांना पुरस्कार* आधार वृक्ष पुरस्कार नाशिक बी एस एफ बहुद्देशीय संस्था अमरावती आयोजित आवाज लेखणीचा राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन भिमाबाई जोंधळे पुस्तकांच हॉटेल, रिलॅक्स कॉर्नर, दहावा मैल, मुंबई आग्रा हायवे, ओझर, नाशिक याठिकाणी करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या मुख्य आयोजक वैशाली सोनवणे व भूषण सरदार असून अश्विनी सांगळे यांचे विशेष सहकार्य आहे. कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असून या ठिकाणी शेतकरी आत्महत्या, स्त्री भ्रूण हत्या, लोकशाही, प्रेम, निसर्ग इत्यादी कवितेचे विषय आहेत. सहभागी कवींना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.तसेच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या साहित्यिक, समाजसेवक व पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.प्रोग्राम नंतर जेवणाची सोय केलेली आहे. पुरस्कारासाठी 9420621994 व्हाट्सअप वर संपर्क करावा अशी माहिती भूषण सरदार यांनी दिली. हे राज्य स्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा २१ सप्टेंबर ला नाशिक येथे होणार असून यासाठी नाव नोंदणी सुरु आहे अशी माहिती प्रसिद्ध कवयित्री व कवी संमेलनाच्या मुख्य आयोजक वैशाली सोनवणे यांनी दिली. सदर काव्य संमेलनात नाशिक जिल्ह्यातील ५ निवडक आदर्श पत्रकारांना सत्यशोधक पत्रकार पुरस्कार, ५ उत्कृष्ट समाज सेवकांना जनहित गौरव पुरस्कार व नाशिक जिल्ह्यातील ५ नामांकित साहित्यिकांना शब्दशूर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


