
बागलाण तालुकास्तरीय विविध शालेय स्पर्धेचे आयोजन
नाशिक प्रतिनिधी – डॉ. शाम जाधव
बागलाण. आज दिनांक ३/९/२०२५ रोजी बागलाण तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणे संचलित के.टी.बिरारी माध्यमिक व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय कंधाणे( ता. बागलाण) येथील १९ वर्षाखालील मुले व मुली या दोघेही संघांनी तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. पुढील खेळासाठी या संघाची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.सदर स्पर्धा जनता विद्यालय मुंजवाड येथे घेण्यात आल्या होत्या. प्राचार्य पवन काकुळते , प्राचार्य शशिकांत सूर्यवंशी, प्रा.कल्याणी अहिरे, प्रा.दुर्गा चौरे, प्रा.कोमल अहिरे, प्रा.धीरज सूर्यवंशी तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरील विजय संघांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.विजयी संघाचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाघ, विद्यमान अध्यक्षा वैशाली वाघ , बागलाण तालुका क्रीडा विभाग तालुकाध्यक्ष गणेश वाघ , मधुकर देवरे , शांताराम भदाणे , विजय सूर्यवंशी , आबा अहिरे , विशाल अहिरे , भाऊसाहेब निकम सर, आर जी जाधव , थोरात सर , दिनेश माळी या सर्वांनी उत्कृष्ट क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते . तसेच जिल्हा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.फोटो -तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत कंधाने येथील विजय संघासोबत विज्ञान विभाग प्राचार्य पवन काकुळते, कला विभाग प्राचार्य शशिकांत सूर्यवंशी.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


