

सौ ज्योती जोशी व सौ प्रिया भारते यांना सन्मानपत्र देऊन कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फौंडेशन तर्फे सन्मानित
नाशिक प्रतिनिधी –
दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक येथे कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फौंडेशन तर्फे आयडी कार्ड वाटप व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गणेशउत्सव मध्ये अनेक उपक्रम संस्था तर्फे राबविण्यात आले त्यामध्ये सहभाग व छान कार्या साठी सन्मानपत्र देण्यात आले. सौ ज्योती जोशी व सौ प्रिया भारते कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फौंडेशन पदाधिकारी यांच्या कार्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुनिलभाऊ परदेशीं, प्रमुख पाहुणे माजी रिटायर्ड सहाय्यक पोलीस आयुक्त मुबंई श्री केशवराव गायकवाड, रिटायर्ड ACP श्री प्रभाकर रायते, माजी नगरसेवक श्री जगदीश पाटील, संस्था चे राष्ट्रीय डायरेक्टर श्री राजेंद्र आहेर , सौ आरती आहिरे, सौ रोहिणी कुमावत, डॉ संदीप काकड यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम संपन्न झाला व यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


