
*नाशिक नगरीत २६ ऑक्टोबरला मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा*
*विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार २०२५ पुरस्काराने सन्मानित करणार*
नाशिक जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये सदैव आपल्या कार्य कर्तृत्वाच्या बळावर नावलौकिक मिळविलेल्या मायमाऊली फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपयोगी कार्यक्रम राबविले जात असून मायमाऊली फाउंडेशन चा प्रथम वर्धापन दिन २६ ऑक्टोबर रोजी संपन्न होत असून या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार २०२५ हा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित केले जाणार आहे अशी माहिती मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ संदीप काकड मखमलाबाद नासिक यांनी दिली आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी आध्यत्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य, कला – अभिनय, पत्रकारिता, साहित्यिक ई क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात येणार असुन मायमाऊली शिवशक्ती फाऊंडेशन सामाजिक कार्यात अग्रेसर असून गोर गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, कपडे वाटप, अन्नधान्य वाटप, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, दिव्यांग आश्रम आदिवासी पाडे ई ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे तसेच आर्थिक दृष्टीने गरजूंना वैद्यकीय व शैक्षणिक कामासाठी आर्थिक मदत करणे यासारखे अनेक उपक्रम संस्था मार्फत केले जातात. तसेच संस्थेतर्फे समुपदेशन, व्यसनमुक्ती व वैद्यकीय शिबीरे राबविले जातात.मायमाऊली शिवशक्ती फाऊंडेशन अंतर्गत मायमाऊली गो शाळा, मायमाऊली वृद्धाश्रम, मायमाऊली न्यूज, मायमाऊली अन्नछत्र, मायमाऊली सेवा श्रम, मायमाऊली मेडिटेशन केंद्र, मायमाऊली हिलींग सेंटर आणि रुद्रा समुपदेशन केंद्र ई उपक्रम वर काम चालू आहे. संस्थेचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त २६ ऑक्टोबर २०२५ रोजी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्या साठी मुख्य आयोजक डॉ संदीप काकड (9921390038) ,डॉ शाम जाधव (7248993599), श्री मनिष मुथा (8956811122), रामभाऊ आवारे निफाड (8788504512) तसेच आयोजक समिती मध्ये सर्व संस्था चे पदाधिकारी यांचा समावेश आहे. पुरस्कार सोहळ्याबद्दल अधिक माहितीसाठी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


