

मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन प्रथम वर्धापन दिन, राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा, दैनिक भारत न्यूज चॅनेल उद्घाटन सोहळा २६ ऑक्टोबर नाशिक येथे संपन्न होत आहे
नाशिक प्रतिनिधी – शाम जाधव
नाशिक.आज दिनांक दि १९ ऑक्टोबर पंचवटी मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशन च्या प्रथम वर्धापन दिना, राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व दैनिक भारत न्यूज चॅनेल ( नॅशनल )च्या उदघाटन सोहळा साठी नियोजन साठी पदाधिकारी मिटिंग घेण्यात आली. पुरस्कार सोहळा २६ ऑक्टोबर २०२५ रविवार रोजी नाशिक येथे सकाळी १० ते ४ या वेळेत होणार आहे. व कार्यक्रम चा पत्ता स्त्री मंडळ हॉल, तिडके कॉलनी, वेदमंदिर च्या बाजूला, मायको सर्कल, त्र्यंबकेश्वर रोड . येथे घेण्यात येणार आहे. कार्यक्रम साठी प्रमुख अतिथी महंत श्री भक्तीचरणदास महाराज, कार्यक्रम चे अध्यक्ष श्री जयप्रकाश पवार, प्रमुख पाहुणे ऍड विलास आंधळे, श्री सुनिलसिंग परदेशीं, श्री विनय मगनलाल कर्नावत यांना प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ शाम जाधव, श्री मनिष मुथा, श्री रामभाऊ आवारे, डॉ अशोक पगारे, यांनी मोलाचे योगदान करीत आहे.त्यानिमित्ताने आज घेण्यात आलेल्या मिटिंग मध्ये सर्व मुद्यांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम चे नियोजन आराखडा तयार करण्यात आला . यावेळेस प्रीती म्हसदे मॅडम व रामेश्वरी म्हस्के मॅडम यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी डॉ शाम जाधव, श्री मनिष मुथा, डॉ अशोक पगारे, श्री राजूभाऊ जगताप, राजनंदिनीताई आहिरे, ऍड उषा पगारे, ज्योतीताई जोशी, प्रिया भारते, प्रीती म्हसदे, रामेश्वरी म्हस्के, रेखा काकड आणि डॉ संदीप काकड ई पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


