

नाशिक कुंभमेळा २०२७: बकरी व्यापारावर बंदी घालण्याची पंचदशनाम आवाहन आखाड्याची मागणी!
नाशिक प्रतिनिधी – श्री विजय बागुल
नाशिक: आगामी २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, श्री पंचदशनाम आवाहन त्रंबकेश्वर महंत ठानापति आनंद पुरी जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आखाड्याने नाशिक शहरात अवैध बकरी विक्री रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे लेखी निवेदन दिले आहे. कुंभपर्वाच्या पावित्र्याची आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आखाड्याने केली आहे.निवेदनातील मुख्य मुद्दे: कुंभमेळ्याचे पावित्र्य: २०२७ साली होणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो संत, महंत, साधू आणि भाविक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. या पवित्र सोहळ्याचे पावित्र्य आणि व्यवस्था कायम राखणे अत्यंत आवश्यक आहे. अवैध बकरी व्यापार: नाशिक परिसरात, विशेषत: हवाई वाहतूकद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध जिवंत बकऱ्यांचा व्यापार केला जात असल्याची माहिती आखाड्याला मिळाली आहे. संक्रमण आणि आरोग्य धोका: या बकऱ्यांपैकी काही संक्रमित (infected) असू शकतात, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि धार्मिक वातावरण दोन्हीसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. धार्मिक आणि सामाजिक शांतता: हा व्यापार केवळ कायद्याचे उल्लंघन करणाराच नाही, तर सार्वजनिक आरोग्य आणि धार्मिक वातावरणासाठीही अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे नाशिकची धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख शांततापूर्ण आणि पवित्र राखण्यासाठी बकरी विक्रीचा हा अवैध व्यापार पूर्णपणे थांबवावा, अशी विनंती करण्यात आली आहे.श्री पंचदशनाम आवाहन आखाड्याचे महंत ठानापति आनंद पुरी जी महाराज त्र्यंबकेश्वर यांनी पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक साहेब व ग्रामीण पोलीस अधीक्षक मा.बाळासाहेब पाटील यांना या गंभीर बाबीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.



