
बौद्ध,दलित,आदिवासी, ओ.बी.सी, अल्पसंख्यांक या सर्वच समुहाचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सदैव कटिबद्ध
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक.निफाड नाशिक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी निफाड चे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांची समक्ष भेट घेऊन निफाड तालुक्यातील मौजे देवगाव येथील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या घरकुलाबाबत निवेदन देऊन चर्चा केली.मौजे देवगाव येथील आदिवासी गेल्या ५० ते ६० वर्षांपासून पाटबंधारे विभागाच्या जागेवर आपले वास्तव्य करून राहत आहे, परंतु त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यांना कुठल्याही प्रकारची नागरी सुविधा उपलब्ध नाही, त्यांचे कुटुंब अत्यंत गैरसोय मध्ये राहत आहे, शासनामार्फत घरकुल मंजूर होतात परंतु शासनाची जागा शिल्लक नाही असे मौजे देवगाव ग्रामपंचायत नेहमी सांगत असते म्हणून त्यांचे मंजूर झालेले घरकुल त्यांना मिळत नाही.देवगाव येथे शेतकरी भवनाच्या बाजूला असलेला शासनाचा भूखंड या बांधवांना उपलब्ध झाल्यास हे सर्वच कुटुंब त्या ठिकाणी स्थापित होऊ शकतात किंवा शासनाच्या मालकीच्या इतरत्र असलेल्या जागेवर देखील या नागरिकांना सामावून घेता येऊ शकते.परंतु त्यांच्याकडे सकारात्मकतेने कोणी बघत नसल्याने त्यांच्या घरकुलाचा विषय मार्गी लागत नाही. नमूद रहिवाशांचे मौजे देवगाव येथील रहिवासी पुरावा उदाहरणार्थ आधार कार्ड, रेशन कार्ड ,मतदान ओळखपत्र, मतदान यादीत नाव हे असून देखील ते आपल्या हक्कांच्या घरकुला पासून वंचित आहे. त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळावे या मागणीचे निवेदन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सादर करण्यात आले.यावेळी निफाड तहसिलदार विशाल नाईकवाडे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन घरकुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर करतांना राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयराज पगारे, युवा महाराष्ट्र संपर्कप्रमुख संतोष भाऊ राजगुरू, येवला युवा नेते तुषार भाऊ वाघ,निफाड तालुका अध्यक्ष भूषण भाई पगारे,युवा नेते प्रशांत कटारे,उपाध्यक्ष निफाड तालुका गणेश कुडके, संपर्कप्रमुख निफाड तालुका स्वप्निल पगारे,एकनाथ बर्डे,दत्तू मोरे,राजेंद्र सोनवणे,शिवाजी सोनवणे,सुनील घुते,अशोक पवार,सोमनाथ घुते,कुंदन पवार,नितीन गांगुर्डे,अलका डगळे,मच्छिंद्र इंगळे, दामू पवार,भास्कर सोनवणे,अमोल भवर,अंकुश भवर,अमोल माळी,गुरुनाथ खूरसाने,साईनाथ जिरे,गणेश बंदरे,नाना इंगळे,अजय वटाणे, संतोष माळीराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश निकाळे



