
जागतिक दर्जाचे तीर्थ क्षेत्र असलेल्या साई च्या पावन, पवित्र भुमित शिर्डीत. भव्य दिव्य. साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार सोहळा
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
शिर्डी. जागतिक दर्जाचा पुरस्कार सन्मान सोहळा साई जीवन गौरव पुरस्कार लवकरच होत आहे अध्यक्ष. श्री.सुदाम संसार साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित. राष्ट्रीय पातळीवरील साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार २०२६.हा जागतिक दर्जाचे तीर्थ क्षेत्र व.पर्यटन क्षेत्र म्हणून सर्वानाच परिचित असलेले व साई च्याच पदस्पर्शाने पावन व पवित्र भुमित
शिर्डीत. दिनांक. १०.जानेवारी.२०२६.वार.शनिवार रोजी ठिक सकाळीच. १०.वाजता निसर्ग रम्य वातावरणात परिवार लाॅन्स,बॅंकेट हाॅल,न्यू रिंग रोड. सिटी मार्केट शेजारी.इंडियन पेट्रोल पंप पासुन जवळच शिर्डीत होत आहे.या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थितीत सिनेमा क्षेत्रातील सेलिब्रिटीज,सामाजिक क्षेत्रातील नामवंत समाज सेवक,उद्योजक क्षेत्रातील नामवंत उद्योजक,संरक्षण क्षेत्रातील नामवंत कंमांडोज तसेच लावणी सम्राट मा.आकांक्षा कुंभार व अनुश्री.खांडेकर या दोन दिग्गज लावणी सम्राट यांच्या उपस्थितीत व यांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात येणार आहे.तसेच या दोन लावणी सम्राट यांचा मराठमोळ्या बहारदार व मनाला मोहित करणार्या सुवर्ण पदक विजेत्यांचा लावण्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.तसेच संगीत क्षेत्रात सुवर्ण पदक विजेत्या मा.डाॅ.विदयाश्री मांडवकर. मुंबई यांचा संगीत गीतांचा बहारदार आसा कार्यक्रम होणार आहे.या पुरस्कार सोहळ्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सुमारे २१२.मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच या पुरस्कार सोहळ्यास सुमारे १०००\लोकांची उपस्थितीती राहणार आहे.आसा हा आगळा वेगळा भारत देशातील साई च्या नावाने साई च्या पावन व पवित्र भुमित शिर्डीत होणारा नेत्रदीपक वादयाच्या सुमधुर गजरात व फटाक्यांच्या अतिषबाजीत तसेच रंगबेरंगी लाईट च्या झगमगाटात संपन्न होणार आहे.या पुरस्कार सोहळ्यास. पुरस्कार सोहळा समातीचे अध्यक्ष व सर्वेसर्वा श्री.सुदाम संसारे.उपाध्यक्षा.मा.विद्या ठाकुर. कार्याध्यक्ष. मा.श्री.राजेश काळे.सल्लागार. मा.डाॅ.माधव वानखडे.सरचिटणीस. मा.श्री.संभाजीराव खैरे,समाधान बिथरे,मा.शंकरराव कन्हेरकर तसेच संयोजक. मा.राजेश भांगे ,मा.अमित पाटील. स्वागताध्यक्ष. मा.सौ.राजनंदीनी अहिरे,मा.कविता वडनेरकर,मा.आरती बारवसे,मा.पायल राजगुरु, मा.वंदना गव्हाणे ,मा.रंजना बलसाने.,मा.प्रिती म्हसदे,मा.मिनाक्षी अहिरे.तसेच प्रसिद्धी प्रमुख. मा.श्री.वजीर शेख,मा.श्री.रामभाऊ आवारे,मा.श्री.डाॅ.शाम जाधव,मा.श्री.प्रदीप मगरे,मा.रजपुत सर,मा.श्री.दिपक गरुड. हे सर्व चार महिन्यांपासून हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्या साठी आहोरात्र मेहनत व परिश्रम घेत आहेत. या पुरस्कार सोहळ्याच्या शेवटी एक लक्की ड्राॅ.चा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.त्यात भाग्यवान 12.महिलांना पैठणी साडया सप्रेम भेट म्हणून देण्यात येणार आहेत. तसेच पुरुषा मधील 12.भाग्यवान पुरूषांना 12.पॅन्ट पीस व शर्ट पीस. सप्रेम भेट म्हणून देण्यात येणार आहेत. तर आशा आगळ्या वेगळ्या आज पर्यंत कोणीही न केलेल्या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास आपण येऊन या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा आसे सोहळा समितेचे अध्यक्ष मा.श्री.सुदाम संसारे यांनी नम्र आव्हान केले आहे.


