


प्रेस नोट*सांगली–मिरज सरकारी रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांचे भीषण शोषण उघड!**बीव्हीजी इंडिया लिमिटेड व क्रिस्टल कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी – वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली संतप्त* नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव सांगली आज रोजी १८/११/२०२५ सहाय्यक कामगार आयुक्त आणि अधिष्ठाता, सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल यांना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्षात भेट घेऊन दिले विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी आपल्या दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या २३० हून अधिक कंत्राटी सफाई कामगारांवरील आर्थिक, मानवीय आणि प्रशासनिक शोषण आता टोकाला पोहोचले आहे. ते आपल्या जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य दिलेले काम प्रामाणिकपणे चोख बजावत आहेत. त्यांचा डायरेक्ट घाणीशी संबंधित असून कळत नकळत त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय, या साठी सुरक्षा साधने कंपन्यांनी पुरवणे गरजेचे असते, त्यांना गम बूट, हॅन्ड ग्लोज, मास्क, इतर आवश्यक औषध उपचार तसेच त्यांच्या सुरक्षेची हमी कंपन्यांनी घेणे कायदेशीर धोरणानुसार त्यांचे कर्तृत्व आहे. परंतु तसे होताना दिसत नाही.याचबरोबर, मागील १० वर्षांपासून कार्यरत असलेल्या या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार, बोनस, हक्क आणि सुरक्षितता – कशाचाही पुरवठा न होणे हा प्रकार उघडकीस आला आहे.या कामगारांना खालील दोन खाजगी कंपन्यांकडून नेमण्यात आले आहे –बीव्हीजी इंडिया लिमिटेड (BVG INDIA LTD.) – सांगली सिव्हिलमध्ये सुमारे 100 कामगारतर क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड – मिरज सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज मध्ये सुमारे 130 कामगारकार्यरत आहेत.उघडकीस आलेले गंभीर बाब वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या कडून उघड करण्यात आलेले धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.🔹 किमान वेतन अधिनियमाचा उघड उल्लंघन — पगार थकवणी 1-2 महिने नियमित! सुरक्षा साहित्य दिले जात नाही. 🔹 सम समान काम, सम वेतन या तत्वाची पायमल्ली, कामगारांच्या जीवित्वाची तसेच सुरक्षेची हमी नाही.🔹 दरवर्षीचा दिवाळी बोनस – जाहीर होतो, पण प्रत्यक्षात कामगारांना एक रुपयासुद्धा दिला नाही! संबंधित कंपनींचे मॅनेजर तसेच मुकदम आणि प्रशासनातील अधिकारी हे संगनमताने बोनसची रक्कम लाटल्याची शक्यता🔹 रजिस्टरवर फुगवटा दाखवून शासनाकडून जास्त बिलांची उकळपट्टी🔹 काही हॉस्पिटल अधिकाऱ्यांचा कंत्राटी कामगार कामावर मिळण्याऱ्या पगारावर टक्केवारीत ‘थेट’ सहभाग🔹 सुपरवायझरांकडून कामगारांना धमक्या – “तक्रार केली तर घरी बसवू!”हा सर्व प्रकार कंत्राटी कामगार (नियमन व संपुष्ट) अधिनियम 1970,किमान वेतन कायदा 1948,बोनस देयक कायदा 1965,Industrial Disputes Act, 1947 यांचे उघड उल्लंघन ठरतो. “हा भ्रष्टाचाराचा आणि शोषणाचा काळा कारभार उघड करणार!”असे प्रशासनाला कळविले आहे.यावेळी, आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे म्हणाले,“रुग्णालयांसारख्या संवेदनशील सेवेत काम करणाऱ्या गरीब कामगारांच्या कष्टाची उघडपणे लूट चालली आहे. पगार, बोनस, सुरक्षितता — कशाचाही मान राखला जात नाही. काही अधिकारी आणि ठेकेदार कंपनी हा संपूर्ण प्रकार ‘व्यवहार’ म्हणून चालवत आहेत.हा काळा कारभार आम्ही आता थांबवणारच!”आता, श्रमिक कष्टकरी चतुर्थश्रेणी कामगारांच्या वर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही.वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेच्या ठाम मागण्या या निवेदनाद्वारे सादर केला आहेत 1️⃣ दोन्ही कंपन्यांवर तातडीने चौकशी व कायदेशीर गुन्हे दाखल करावेत2️⃣ कामगारांना तत्काळ संपूर्ण किमान वेतन + arrears दिले जावेत3️⃣ मागील सर्व वर्षांचा बोनस त्वरित अदा करावा4️⃣ कामगारांना धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी5️⃣ कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाची चेतावणी देण्यात येत आहे यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित कंपन्याची आणि प्रशासनाची असेल “कामगारांवर अन्याय झाला तर रुग्णालय प्रशासन स्वस्थ बसू देणार नाही!”कामगार संघटना एकवटली असून,लोकशाही मार्गाने होणाऱ्या मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. यांची नोंद व दखल घ्यावी. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. , यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव यांच्या बरोबर सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


