

डोंगराळेतील घटनेच्या विरोधात मानवाधिकार संघटना आणि सामाजिक चळवळ संघटना तर्फे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आले
नाशिक प्रतिनिधी डॉ शाम जाधव
नाशिक:- मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे कु. यज्ञा जगदीश दुसाने (वय 4) या निरागस चिमुकलीवर प्रथम अत्याचार करून त्यानंतर निर्घृणरीत्या हत्या करण्यात आली. या क्रूर आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या गुन्ह्याच्या विरोधात संपूर्ण समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी
संघटनेच्या वतीने प्रशासनाला साकडे घालत म्हटले की—
“अशा भयानक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तात्काळ व कठोर शिक्षाच समाजातील गुन्हेगारांना रोखू शकते. पीडितेला न्याय मिळावा यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे.”
निवेदनाद्वारे तात्काळ कायदेशीर कारवाई वाढवण्याची मागणी करण्यात आली.
उपस्थीत – सर्व पदाधिकारी
मानव अधिकार संघटना अध्यक्ष गुड्डूभाई सय्यद, सामाजिक चळवळ संघटना अध्यक्ष मनिषाताई म्हसदे,
रफिक सय्यद पत्रकार, रविंद्र त्रिभुवन NGO, अंजू चव्हाण, राजनंदिनी अहिरे, उषा तांबे, ज्योती काजळे, राधा क्षीरसागर, रेखा मंजुळकर, रोहिणी वाघ, कोमल जाधव, संगीता पवार, कांचन लोखंडे फरीदा शेख, राजश्री साळवे, रंजना जाधव, मनिषा बागुल, वृषाली शेलार, शीला गोसावी, रोशनी चव्हाण, घोलप सर, रोशन पगारे, धीरज बागुल आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक – डॉ संदीप काकड ( 9921390038 )


