
न्यु होम मिनिस्टर – खेळ पैठणी चा भव्य दिव्य कार्यक्रम लवकरच डिसेंबर मध्ये नाशिक नगरीत साकारणार.
नाशिक प्रतिनिधी – श्री मनिष मुथा
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याच्या स्वबलावर कार्यरत असणारी मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन (राष्ट्रीय संस्था ) सामाजिक बांधिलकी जोपासात अनेक उपक्रम राबवत असतें. यावेळेस महिलांना त्यांच्या तील सदगुणांना वाव मिळावा व त्यांना मुक्तछंद जोपसता यावा म्हणून “खेळ पैठणी – चा न्यु होम मिनिस्टर ” कार्यक्रम लवकरच डिसेंबर 25 मध्ये नाशिक नगरीत आयोजित होत आहे. या मध्ये मनोरंजन खेळ घेतले जाणार आहे. व महिलांना त्यांच्यातील कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मध्ये 3 विजेते ची निवड केली जाणार व त्यांना प्रथम क्रमांक पैठणी द्वितीय व तृतीय क्रमांक यांना ज्वेलरी गिफ्ट देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व महिलांना प्रत्येकी सहभाग प्रमाणपत्र व गिफ्ट देण्यात येणार आहे. सोबतच जेवणाची व्यवस्था ही करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ संदीप काकड यांनी दिली.
या कार्यक्रम साठी आयोजक व प्रायोजक मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन व HDFC life नाशिक असेल. या सर्व कार्यक्रम चे आयोजक समिती सौ रेखा काकड, सौ तृप्ती जैन, सौ सुनीता धनतोले, सौ राजनंदिनी आहिरे, डॉ संदीप काकड, डॉ शाम जाधव, श्री मनिष मुथा, श्री पंकज कडलग, श्री अरुण सर व प्रसिद्धी प्रामुख श्री रामभाऊ आवारे आहेत.
मीडिया पार्टनर म्हणून दैनिक भारत नॅशनल न्यूज व मायमाऊली न्यूज आहेत.
अधिक माहिती साठी संपर्क-: डॉ संदीप काकड (9921390038)


