

*नाशिक :-न्यू दारणा हायस्कूल गांधीनगर येथे विद्यार्थ्यांना टोप्यांचे वाटप अक्षय फाउंडेशनच्या अध्यक्षा मोनादीदी यांच्या वतीने तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून न्यू दारणा हायस्कूलचे शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे उपाध्यक्ष श्री.साहेबराव सवारी पवार,सौ. मनीषाताई सोनार यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.* *अक्षय फाउंडेशनचा उपक्रम स्तुतीय असून मोना दीदी यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे.असे मनोगत न्यू दारणा हायस्कूलचे शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे उपाध्यक्ष श्री. साहेबराव सवारी पवार यांनी मनोगत व्यक्त केले.* *शाळेचे मुख्याध्यापक श्री गोरख कुणगर यांनी स्वागत केले.* *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री,एस बी कुशारे यांनी केले.* *राज्यात पडलेल्या तीव्र थंडीपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांना उबदार टोप्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. शिक्षकांनाही टोप्यांचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.* *सदर कार्यक्रमास श्री.डी. आर. पगार, श्री. बी. पी.पाटील, श्री भाऊसाहेब पगार आदिसह शिक्षक व शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*


