

कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशनच्या वर्धापन दिनाच्या नियोजनासाठी बैठक संपन्न.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड
आज दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी, संस्थापक अध्यक्ष सुनिलसिंग परदेशीं, राष्ट्रीय महिला संघटक आरती आहिरे, राष्ट्रीय डायरेक्टर संदीप काकड यांच्या आध्यक्षतेखाली कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशनच्या आगामी वर्धापन दिनानिमित्त सविस्तर नियोजन करण्यासाठी बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीत वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली असून पथनाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. संघटनेच्या उद्दिष्टांची प्रभावी मांडणी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व सदस्यांनी एकत्रितपणे संघटनात्मक काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या बैठकीदरम्यान फाउंडेशनच्या नवीन सदस्यांना ओळखपत्रे (आय-कार्ड) वितरित करण्यात आली. यामुळे संघटनेची ओळख अधिक सुदृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांचे सहकार्य आणि उपस्थितीबद्दल आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले. आगामी वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीपणे साजरा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.यावेळी आपण सर्वांनी मिळून एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करून दाखवू हा विश्वास आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने व पाठबळावर शक्य आहे नियोजन करण्यासाठी सर्वांनी मिळून सहकार्य करावे ही नम्र विनंती करतो कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन राष्ट्रीय लेव्हलला लवकरच कार्यान्वित होणार आहे आपल्या संस्थेच्या कामातुन येथे प्रत्येक सदस्याला संधी मिळणार आहे काही तरी नवीन करून दाखवण्याची फक्त हवी अनमोल साथ व सहकार्य आज आपण सर्व पदाधिकारी व नवनिर्वाचित पदाधिकारी सहभागी झाले सर्वांचे मनापासून धन्यवाद व अभिनंदन. कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन राष्ट्रीय कार्यकारिणी कोर कमिटी मेंबर पदाधिकारी व सदस्य.


