

*कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशनची वर्धापन दिन नियोजन बैठक व मिसळ पार्टी उत्साहात संपन्न*
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड
आज दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी संस्थापक अध्यक्ष सुनिलसिंग परदेशी, राष्ट्रीय सचिव राजेंद्र आहिरे, राष्ट्रीय महिला संघटक आरती आहिरे, राष्ट्रीय डायरेक्टर संदीप काकड यांच्या आध्यक्षतेखाली कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशन तर्फे येणाऱ्या वर्धापन दिनाच्या आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा व नियोजन बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत वर्धापन दिन कसा साजरा करायचा, कार्यक्रमाची रूपरेषा, सामाजिक उपक्रम, सहभागी सदस्यांची भूमिका तसेच पुढील कार्ययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर सर्व सदस्यांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या अनौपचारिक मिसळ पार्टीमुळे सदस्यांमध्ये आपुलकी, एकोप्याची भावना अधिक दृढ झाली. सामाजिक कार्यासाठी एकत्र काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी या वेळी आपले अनुभव, सूचना व भावी उपक्रमांबाबत मनमोकळा संवाद साधला. या बैठकीस फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी वर्धापन दिन हा समाजोपयोगी उपक्रमांनी व सकारात्मक संदेश देणाऱ्या कार्यक्रमांनी साजरा करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. *तसेच आज बऱ्याच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या फाउंडेशन च्या वर्धापन दिनासाठी आर्थिक योगदानास सुरुवात केली*. आज शिवकन्या फिटनेस सेंटरच्या फिटनेस ट्रेनर शीतल भदाने मॅडम यांनी सर्वांचे आरोग्य चेक अप करून आरोग्य विषयी मार्गदर्शन केले मनापासून धन्यवाद. सर्वांच्या उपस्थिती मुळे आज झालेली ही बैठक व मिसळ पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली.
त्याबद्दल सर्वांचे कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशन च्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. पोलिस मित्र फाऊंडेशन राष्ट्रीय कार्यकारिणी कोर कमिटी मेंबर पदाधिकारी व सदस्य.


