
मला सांगना गाण्याचे पोस्टर उद्घाटन सोहळा संपन्न
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक आज रोजी स्वराज्य फिल्म प्रोडक्शन फिल्म प्रोडक्शन निर्मित मला सांगना या गाण्याचे पोस्टर आणि प्रीमियर आज करण्यात आहे. प्रमुख भूमिकेत लक्ष्मण वरवडे आणि समीक्षा पोटभरे यांनी काम केले आहे. या गाण्याचे दिग्दर्शक गिरीश राजुरकर तसेच छायाचित्रन विकी लकेरी यांनी केलं आहे. गाण्याचे कोरिओग्राफी घनाक्षी लोंढे एक महाराष्ट्र पोलिस आहेत, मेकअप आर्टिस्ट म्हणून माधुरी चव्हाण यांनी केले आहे. येत्या २२ जानेवारी ला हे गान आपल्या भेटीला येणार आहे. ऑरेंज म्युझिक कंपनी या युट्यूब चॅनेल वर रिलीज होणार आहे. या गाण्याचा मुख्य अभिनेता लक्ष्मण वरवडे हा एक ग्रामीण गावा मधून असून यांना चित्रपट क्षेत्रात काम करण्याचे होते, हे स्वप्न घेऊन हे पुण्याला आले, पूर्ण पुणे आपल्याला कुठे काम मिळणार का या आशेने त्यांना स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना मिळाली स्वथापक अध्यक्ष गिरीश राजुरकर यांच्या सोबत त्यांनी मुलाखत झाली. लक्ष्मण वरवडे यांचे मोठे स्वप्न बघून गिरीश राजुरकर यांनी त्यांना मोठे करायचे ठरवून मला सांगना हे गाणं शूट केलं. एक गरीब कुटुंबातून वर आलेला लक्ष्मण वरवडे आज हिरो झाला. सोबतच समीक्षा पोटभरे यांचा ही प्रवास खूप अवघड घरच्यांची परवानगी नसताना सुद्धा आपल्या घरी भांडण करून त्यांनी या गाण्यात काम केल आणि आपला ठसा लोकांपर्यंत पोहचवला. या गाण्याच्या पोस्टर उद्घाटनाला सत्यशोधक चित्रपटाचे निर्माता बाळा साहेब बांगर, समाजसेवक भाग्यदेव घुले, ज्ञानेश्वर दादा आल्हाट, कामगार संघटनेचे अध्यक्ष धीरज साबळे,यश डांगे, शिवतेज मित्र संघटनेचे अध्यक्ष राज दास हे उपस्थित होते. आज या दोघांची मेहनतीने ही गाण लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.


