घर अंगण बहुउद्देशीय संस्था नाशिक शालेय साहित्य वाटप
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक.म्हसरूळ. आज दिनांक ३/७/२०२५ रोजी ए टी पवार आदिवासी आश्रम येथे निराधार मुलांना शालेय वस्तूचे व खाऊचे वाटप करण्यात आले घर अंगण संस्था ही नेहमीच सहकार्य करणारी व सहभागी असणारी विभाज्य गोष्टींची आज माणसाला गरज आहे ध्येय एकच ओळख माणुसकीची हे घर अंगण बहुउद्देशीय संस्था ब्रीदवाक्य आहे. संस्थेच्या अध्यक्षा सौ आशा भोईर यांनी कार्यक्रमात सांगितले आपण आपले आयुष्य मुक्त जगायला महत्त्व नाही पण ते किती चांगले कार्य करून जगलो याला अर्थ आहे हेच ध्येय प्रत्येकाचे असावे असा त्या म्हणाल्या कार्यक्रमाची सुरुवात आश्रम शाळेतील मुलांनी प्रार्थना म्हणून करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून म्हसरूळ पोलीस निरीक्षक श्री उमेश बोरसे सर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शालेय वह्या देण्याचा आरंभ करण्यात आला तुमचे पुढील आयुष्य घडणार आहे घर अंगण बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव सौ अनिता पाटील यांनी शिक्षणाचे महत्त्व काय आहे आदर्श विद्यार्थी कसा करतो ही माहिती पटवून दिली घर अंगण बहुउद्देशीय संस्थेचे उद्दिष्ट काय व कार्य काय आहे याची माहिती दिली सूत्रसंचालन सौ रुपाली पवार मॅडम ( सिने कलाकार ) यांनी मुलांना आपलं आयुष्य सुंदर घडवा शिक्षकांचा आदर वडीलधाऱ्यांचा आदर करा खेळांमध्ये नाविन्यपूर्ण आपल्या अंगी बाळगा. खळबळ वेब सिरीज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली खळबळ च्या निर्मात्या रेखाताई मंजूरकर आणि त्यांचे सहकार्य शालेय विद्यार्थी मुलांना खाऊ वह्या वाटप करून आनंददायी केले घर अंगण बहुउद्देशीय संस्थेच्या व्यवस्थापक उषाताई सूर्यवंशी आणि स्वाती गोसावी यांनी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. खजिनदार पुनम भोईर, विभाग प्रमुख अशोक बोरसे, श्रीकांत मोरे पाटील, ईश्वर अधिकारी मुंबईचे पत्रकार प्रमोद दळवी, शुभम कानडे, प्रकाश गांगुर्डे, सारिका मॅडम ए टी पवार आश्रम शाळा शिक्षक पवार सर, काळे सर व सुनीता जाधव यांनी सुंदर नियोजन केले. आश्रम शाळेचे अधिकारी सुनीता जाधव संस्थेच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले



