

द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा घोटी शहर महिला विभाग वर्षावास प्रारंभ पुष्प दुसरे
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
इगतपुरी. घोटी बु. आज दिनांक १३/७/२०२५ रोजी भारतीय बौद्ध महासभा घोटी शहर शाखा महिला विभागाच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीत वर्षावास प्रवचन मालिकेतील नालंदा बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर घोटी शहर या ठिकाणी अतिशय सुंदर व मंगलमय वातावरणात भगवान बुद्ध पहिले प्रवचन- विशुद्धी मार्ग हा विषय प्रवचनकार इगतपुरी तालुक्याचे भूमिपुत्र व केंद्रीय शिक्षक आयु. एन. बी. पगारे गुरुजी यांनी पूर्ण केले. तसेच घोटी शहर महिला अध्यक्ष वंदनाताई रुपवते व पदाधिकारी सर्व महिला उपासिका यांच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे माजी अध्यक्ष व केंद्रीय शिक्षक आयु एन बी पगारे गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजक रेणुकाताई विष्णू रुपवते, जानवी रुपवते ( पवार)BRSP महाराष्ट्र प्रदेश सचिव, रोहिणी विष्णू रुपवते यांच्या हस्ते पुष्प पूजन करून बौद्धाचार्य प्रभाकर चिकणे गुरुजी त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा भीमस्मरण व भीमस्तुती या कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन घोटी शहराच्या संघटक सुनिता ताई भोले यांनी केले. रेणुका रुपवते, जानवी रुपवते, रोहिणी रुपवते, एन बी पगारे गुरुजी यांनी धम्मदान देऊन उपस्थित यांना अल्पोहार देऊन वर्षावास धम्मदान पारमिता पार पाडली. जानवी रुपवते यांनी सर्व उपस्थित यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व आभार मानले अशा प्रकारे दुसरे पुष्प संपन्न करण्यात आले. माजी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वि. म .रुपवते गुरुजी, चंद्रभागा रुपवते (केंद्रीय शिक्षिका ), बौद्धाचार्य प्रभाकर चिकणे गुरुजी , चंद्रकांत रुपवते( विहार कमिटी अध्यक्ष),मा. गोपाल दिवेकर, बौद्धाचार्य राहुल शिंदे गुरुजी , बौद्धाचार्य अनिकेत उबाळे गुरुजी; कोमलताई रुपवते (सरचिटणीस घोटी शहर), मथुरताई कोळे (उपाध्यक्ष संस्कार घोटी शहर,) रमाताई पटेकर( संस्कार सचिव घोटी), कल्पना रूपवते (संरक्षण उपाध्यक्ष घोटी शहर), सुनिताताई भोले (संघटक घोटी शहर,) लंकाताई वाहुळे (संघटक घोटी शह, ललिताताई भोले, जयश्री रुपवते, रत्न रुपवते, सुनिता रुपवते, रूपाली रुपवते, रूपाली पठारे, चंद्रकला रूपवते, सीताबाई रोकडे, रंजना रुपवते आदी उपासिका व उपासक यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली

मुख्य संपादक
डॉ. संदीप काकड


