

मा. कमलाकर जाधव यांच्या कडून तक्षशीला विद्यालय येथे कॉम्पुटर, प्रिंटर, शैक्षणिक साहित्य भेट नाशिक प्रतिनिधीदि. 12 जुलै शनिवार रोजी देवळाली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र संचालित तक्षशिला विद्यालय मध्ये मा. कमलाकर जयवंत जाधव (सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक ,नाशिक) यांच्या वडिलांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ तक्षशिला विद्यालयांमध्ये कम्प्युटर ,प्रिंटर शालेय उपयोगी साहित्य ,तसेच 150 चार्ट अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच अँड उषा एन पगारे यांनी त्यांच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ नववी व दहावीत प्रथम क्रमांकास ट्रॉपि देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.,यावेळी सौ. प्रवीण जाधव ,डॉ.कीर्ती किशोर बच्छाव ,डॉ.किशोर बच्छाव, डॉ. ज्योती प्रवीणचंद्र केदारे प्रवीणचंद्र कचरू केदारे , सुनील जयवंत जाधव ,अर्चना सुनील जाधव , किरण जयवंत जाधव ,राखी किरण जाधव आणि मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन संस्थापक डॉ. संदीप काकड सर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांच्या मंत्रिमंडळाचे देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन वाटप करण्यात आले ,त्याचबरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा राऊत यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक नंदिनी पगारे जाधव यांनी केले, अनिल शिंदे यांनी शाळेविषयी सविस्तर माहिती दिली मुख्याध्यापक श्री संदीप पांडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले, लक्ष्मण देवरे व संजीव कुमार पवार यांनी शालेय मंत्रिमंडळा विषयी माहिती दिली. शिक्षकेतर कर्मचारी महेश रहाटळ, चित्रा भोसले, संध्या पगारे यांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले ,यावेळी जाधव परिवार यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.मुख्य संपादक डॉ संदीप काकड





