

बौद्ध धम्म संस्कार संघ *श्रावस्ती विहार सांगली
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
सांगली आज दिनांक २०जुलै २०२५ रोजी अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित धम्म भूमी गुगवाड चे अध्यक्ष, सी. आर. सांगलीकर साहेब , डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्कूल, जालंधर पंजाब येथील प्रिन्सिपॉल चंचल बोध मॅडम, प्राध्यापक हुसेन लाल यांनी सायंकाळी साडे सात वाजता सदिच्छा भेट दिली.विहाराचे खजिनदार एस. आर. माने सर यांनी प्रास्ताविक करून सर्व उपस्थितांचे स्वागत केले. विहाराच्या उपाध्यक्षा आयूष्यमती सुनिता धम्म कीर्ती यांचे हस्ते प्रिन्सिपॉल चंचल बोध मॅम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. माने सर यांनी इतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या सत्काराला उत्तर देताना प्रिन्सिपॉल चंचल मॅम यांनी विहाराचे कामकाज चांगल्या प्रकारे आणि उत्कृष्ट चालले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथावर माहे ६ जुलै रोजी परीक्षा आयोजित केली होती या परीक्षेसाठी सर्व जाती जमातीतील परीक्षार्थी /विद्यार्थ्यां यांनी भाग घेतला होता. आणि त्याच दिवशी निकाल ही जाहीर केला. १० जुलै २०२५ आषाढ पौर्णिमा प्रथम धम्मचक्र पवनसुत रोजीच्या कार्यक्रमात प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याबाबत सर्वांचे अभिनंदन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी २१ जुलै, १९४२ रोजी “शिका संघटित व्हा आणि संघर्ष” करा हा जो संदेश दिलेला आहे, त्याप्रमाणे सर्वांना सुशिक्षित बनवून संघटित होऊन अन्याय विरुद्ध संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. त्याची ज्योत संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभर प्रज्वलित करण्याचा संदेश दिला. विहाराचे संचालक , सदस्य,उपासक उपासीका यांनी जालंदर येथे जरूर भेट द्यावी असे त्यांनी आवाहन केले.प्रसिद्ध उद्योजक सी.आर. सांगलीकर यांनी विहाराचे कामकाज अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यरत असून सर्व कार्यक्रम नियोजन पद्धतीने घेत असतात याबद्दल कौतुक केले. विहाराच्या उपाध्यक्षा आयूष्यमती सुनिता धम्म कीर्ती यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले .भंते धम्म बोधी यांनी सर्व उपस्थितांनी धम्म पालन गाथा संपन्न होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.सदर कार्यक्रमास प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे, अध्यक्ष, सेक्युलर मुव्हमेंट महाराष्ट्र राज्य, दिप स्तंभ चे माजी अध्यक्ष भारत शिंदे, प्रकाश आवारे, दयानंद कोलप, स्टेट बँकेचे मॅनेजर बाळासाहेब कुदळे साहेब, जगन्नाथ आठवले, एस. आर. माने, बोधिसत्व धम्म रत्न बोरखडे मामा, महेश शिवशरण (धम्मभूमी गुगवाड चे सदस्य,)सुजाता चंदनशिवे, विद्या राणी कांबळे ताई, हनुमंत साबळे,बाळासाहेब गायकवाड, पवन कदम,तसेच सारनाथ बुद्ध विहार, मिरज येथील पदाधिकारी उपासक उपासिका माता बंधू भगिनी उपस्थित होते.
मुख्य संपादक
डॉ संदीप काकड


