

एन बी.पगारे सेवानिवृत्त नियंत्रण अधिकारी करन्सी नोट प्रेस नाशिक रोड यांच्या पत्नी कुसुमताई एन. पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त गृहपयोगी व अन्नदान करण्यात आले.
नाशिक प्रतिनिधी
दि 27 जुलै 2025 रोजी नाशिक येथे एन बी.पगारे सेवानिवृत्त नियंत्रण अधिकारी करन्सी नोट प्रेस नाशिक रोड यांच्या पत्नी व ऍड उषाताई पगारे (मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन कायदेशीर सल्लागार ) यांच्या आई कुसुमताई एन. पगारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त गृहपयोगी व अन्नदान वाटप करण्यात आले. पंचवटी गोदाघाट येथे माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र येथील वास्तव्यास असलेले बेघर लोकांना अन्नदान करण्यात आले व गृहपयोगी हि देण्यात आला. यावेळी मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन च्या महाराष्ट्र राज्य महिला आध्यक्षा सौ राजनंदिनी आहिरे, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ सुनीता धनतोले, उत्तर महाराष्ट्र कायदेशीर सल्लागार ऍड. उषाताई पगारे, सदस्या सौ पूजा दुदेकर, सदस्या कु. प्रतीक्षा आहिरे, माणुसकी बेघर केंद्र संचालक यशवंत नाशिककर आणि मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन संस्थापक आध्यक्ष डॉ संदीप काकड उपस्थित होते.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड



