

वृद्धाश्रम ही सोय नाही, ती सामाजिक अपयशा ची साक्ष आहे…. नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक आज दिनांक २९/७/२०२५ रोजी वृद्धाश्रम ही सोय नाही, तर ती सामाजिक अपयश ची साक्ष आहे असे वास्तव विचार सौं शामल योगेंद्र पाटील यांनी मांडले सार्वजनिक वाचनालय नासिक च्या पुस्तकं मित्र मंडळ मध्ये डॉक्टर अतुल गवांदे लिखित बिइंग मॉर्टल या पुस्तकावर त्या बोलत होत्या. सौं शामल पाटील या पुढे बोलल्या कि आसध्य आजारानी ग्रस्त रुग्णा ना आणि वृद्धाना केवळ वैध्यकीय उपचार मिळत नाही, व ते उपचार पुरेसे ठरत नाही, तर कुणाचा तरी मदतीचा हात आवश्यक असतो. जीवनातील अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. मृत्यू ला सामोरे जाण्याचे ध्येय व्यक्तीला ठेवावे लागते. मृत्यू स्वीकारण्याची सुद्धा एक मानसिक तयारी ठेवावी लागते. समाजातील व कुटुंबातील वृद्धाची सेवा करणे, आणि त्यांचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाने जगण्यासाठी त्यांना मदत करणे हे नव्या पिढीचे कर्तव्य असल्याचे सौं शामल पाटील यांनी भाषणात बोलताना अपेक्षा केली आहे. वृद्धाश्रम ही सोय नाही तर सामाजिक अपयशाची साक्ष आहे. आपण, समाज म्हणुन याकडे डोळस पणे पाहिले पाहिजे असे भावपुर्ण उदगार सौं शामल पाटील यांनी काढले. सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक पुस्तकं मित्र मंडळ प्रमुख मंगेश मालपाठक यांनी केलें. सौं शामल पाटील यांचा परिचय समिती सदस्य सुहास टिपरे यांनी करून दिला. आभार जयेश बर्वे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ.लक्ष्मीकांत भट यांनी केलें. कार्यक्रम साठी वाचनालय अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, पदाधिकारी संजय करांजकर, सोमनाथ मुठाळ, देवदत्त जोशी, जयेश बर्वे उपस्थित होते.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


