

पहिलं अखिल भारतीय क्षत्रिय पुनर्विवाह संमेलन नाशिकमध्ये!
नाशिक प्रतिनिधी
आज रोजी नाशिक येथे अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या पुढाकाराने पुनर्विवाहाचा जागरविधुर, विधवा, घटस्फोटीतांसाठी विशेष परिचय मेळावा; गंगापूर रोडवरील शंकराचार्य सभागृहात ऐतिहासिक उपक्रम :सामाजिक समतेचा आणि दुसऱ्या संधीचा एक अभूतपूर्व उपक्रम नाशिकमध्ये पार पडला. विधुर, विधवा, विरंगणा आणि घटस्फोटीत व्यक्तींना पुन्हा नव्या आयुष्याची संधी मिळावी, या हेतूनं अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने देशातील पहिलं पुनर्विवाह परिचय संमेलन गंगापूर रोडवरील शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात संपन्न झालं.अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या पुढाकाराने, भारतात प्रथमच विधुर, विधवा, घटस्फोटीत पुरुष-महिलांसाठी विशेष पुनर्विवाह परिचय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं.या उपक्रमात देशभरातून आलेल्या क्षत्रिय समाजातील युवक-युवती आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्रसिंह चव्हाण यांना “समाज भूषण गौरव पत्र” देऊन सन्मानित करण्यात आलं.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनं झाली.नवीन पदग्रहण सोहळाही यावेळी पार पडला.शूरवीर महाराणा प्रतापांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.त्यानंतर दीपप्रज्वलन करून संमेलनाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्रसिंह तंवर,राष्ट्रीय उपाध्यक्ष डी.पी. सिंह,राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि संमेलनाचे मुख्य आयोजक राजेंद्रसिंह चव्हाण,युवा विंग अध्यक्ष डिंपल राणा ,राष्ट्रीय संयोजक (सैनिक विभाग)ग्रुप कॅप्टन जे.पी. चौहान,अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. जसपालसिंह सिसोदिया, महिला प्रदेश अध्यक्ष चंद्रकला सिसोदिया , उपाध्यक्ष महाराष्ट्र ॲड. मोहनसिंह कनोजे, विजयसिंह परिहार, विनोदसिंह ठाकूर, गुरूचरणसिंह यदुवंशी,प्रदेश महामंत्री सुनिलसिंह परदेशी,राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पुनिता रावत, नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेमसिंह राजपूत, छत्रपालसिंह राजपूत, राजेंद्रसिंह परदेशी, राजेंद्रसिंह पवार, डि.आर. पाटील, नरेंद्रसिंह साळुंके, नरसिंह परदेशी,मिनाक्षी परदेशी, भारती राजपूत, विजया राजपूत, सेन्हा परदेशी, गायत्री परदेशी, माया महाले, वर्षा राजपूत, सीमा राजपूत, जगदीश परदेशी, रामसिंग बावरी, मिलिंद राजपूत, ॲड सुनिल सिंह, लक्ष्मणसिंग चंदेल, डि आर पाटील , नाना जाधव किरण राजपूत, जगत सिंह परिहार विरेंद्र परदेशी, आदी मान्यवर उपस्थित होते.या संमेलनाचं आयोजन 2025 या वर्षात भारतातील पहिल्यांदाच केलं गेलं.संमेलनात विधुर, वीरांगणा, घटस्फोटीत व्यक्तींनी आपला परिचय सादर केला, जोडीदार निवडीची प्रक्रिया समाजाच्या विकासाच्या दृष्टीने मोलाची ठरली. ददंन सिंह, हरगोविंदसिंह तोमर मार्गदर्शक म्हणून सहभागी होते.तर मनपा सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.पुनर्विवाह हा केवळ सामाजिक उपक्रम नाही, तो एका नव्या आयुष्याचा प्रारंभ असतो अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या या ऐतिहासिक संमेलनानं समाजात सकारात्मक विचारांची पेरणी केलीय. सुत्रसंचलन श्री राहुल परदेशी यांनी केले आभार महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री सुनिलसिंह परदेशी यांनी मानले 🙏 राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रम सांगता करण्यात आली

मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


