
अखंड ज्योती महिला फाउंडेशन व रोटरी क्लब रक्षाबंधन आनंदात साजरी
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
पिंपळगाव डुकरे. आज दिनांक ८/८/२०२५ रोजी अखंड ज्योती महिला फाउंडेशन पिंपळगाव डुकरा मूकबधिर व मतिमंद आधार आश्रम येथे रक्षाबंधन पवित्र नात्याचा सण अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आश्रमातील सर्व मूकबधिर मतिमंद मुले मुलांची अतिशय आनंदाने सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घेण्यात आला. या जगापासून आपल्या मनापासून दुरवलेल्या मतिमंद मुलांसाठी रक्षाबंधन हा कार्यक्रम आयोजित करून या मुलांशी जवळीक नाते निर्माण करण्यासाठी या सुंदर कार्यक्रमाचे रोटरी क्लब ऑफ देवळाली यांच्या महत्त्वाचे सहकार्य लाभले या उपक्रमा अंतर्गत रोटरी क्लब देवळाली कॅम्प यांनी मूकबधिर मुलांसाठी १०० मेडिसिन बॉक्सेस देण्यात आले तसेच या मुलांना एक वेळेचे भोजन देण्यात साठी माधवी देशमुख उपाध्यक्ष अखंड ज्योती महिला फाउंडेशन व नीतू मस्तुर ( एल एम स्टुडिओ फोटोग्राफी ) यांचे कडून रुपये ५०००/- देणगी दिली अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती गवळी जॉर्ज यांनी मुलांसाठी नॅपकिन देण्यात आले अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या सदस्य व सामाजिक सेविका कविता पाळदे यांनी मूकबधिर मुलांसाठी कॅडबरी चॉकलेट देऊन त्यांचा आनंदात सहभागी झाल्या रक्षाबंधन सन हा गोड केला जयश्री चौधरी यांनी मूकबधिर मुलांसाठी नाष्टा देण्यात आला या कार्यक्रमासाठी अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती गवळी जॉर्ज उपाध्यक्ष माधवी देशमुख सचिव रूपाली वालझाडे व वृषाली गवळी, पूनम बर्वे, अर्चना परश्या, सीमा कविता पाळदे, पूजा गायकवाड, पूजा गाडेकर, संचना देशमुख, ज्योती चाहसे, जयश्री चौधरी, नीतू मस्तूद रोटरी क्लब ऑफ देवळालीचे अध्यक्ष पुष्कर जोशी, सचिव सुभाष मोरे, माजी अध्यक्ष पुणे वृक्षी मॅडम आदी महिला यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. आधार आश्रमातील पालक सर्व स्टाफ मेंबर यांनी सर्वांचे आभार मानले हा कार्यक्रम अगदी आनंदात पार पडला
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


