

जागतिक आदिवासी दिन व भारतीय लष्करी जवान रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरी
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
भगूर. आज दिनांक ११/८/२०२५ रोजी नूतन प्राथमिक विद्यामंदिर भगूर शाळेत जागतिक आदिवासी दिन व एक राखी सैनिकांसाठी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राख्या बनवून ३१७ साठा बॅटरी देवळाली कॅम्प येथील सैनिकांना आरोग्य सेवक यांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. तसेच यावेळी एक वृक्ष आई या उपक्रमांतर्गत परिसरातील वृक्षाला सैनिक व आरोग्य सेवक तसेच शाळेतील मुख्याध्यापिका रंजना सोनवणे व सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत राखी बांधली. यावेळी सैनिकांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनचा शुभ संदेश दिला व गिफ्ट म्हणून खाऊ चे वाटप केले. अशाप्रकारे आदिवासी दिन अतिशय उत्साहात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


