

७९ स्वातंत्र्य दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र नाशिक संचलित, तक्षशिला विद्यालय उत्साहात संपन्न.
नाशिक प्रतिनिधी -संपादक डॉ. शाम जाधव
नाशिक रोड. आज दिनांक १५/८/२०२५ रोजी ७९ स्वातंत्र्य दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र संचलित, तक्षशिला विद्यालय नासिक रोड, हे इसवी सन १९६० स्थापन झालेली संस्था असं ती देवळाली गाव ,नाशिक रोड. या ठिकाणी आहे.या विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायत सादर करण्यात केली. तक्षशिला विद्यालय नासिक रोडचे मुख्याध्यापक श्री.संदीप पांडे सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सन्माननीय संचालक माननीय करुणासागर पगारे दादा,, प्रमुख पाहुणे म्हणून मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप काकड. हे उपस्थित होते, मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण प्रसंगी मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या सौ रेखा काकड, मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनच्या सल्लागार व विद्यालयाच्या सखी सावित्री आणि विशाखा समितीच्या कायदेशीर सल्लागार ॲड. उषाताई पगारे, मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या सौ राजनंदिनी आहिरे , मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते डॉ. शाम जाधव, मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशन चे उत्तर महाराष्ट्र कार्य अध्यक्ष व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते श्री मनीष मुथा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशन च्या वतीने तक्षशिला विद्यालयस यांना प्रयोगशाळा साहित्य भेट देण्यात आले.
तसेच विद्यालया तर्फे वीरमाता लीलावती माणिक माने यांना गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन कार्यक्रम प्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नीलिमा राऊत यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय श्रीमती मंगला पाटील मॅडम यांनी करून दिला तर शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडे सर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपशिक्षक श्री देवरे एल बी, श्री पवार एस टी शिक्षक , उपशिक्षिका श्रीमती पगारे नंदिनी एन,श्रीमती एम .एच .पाटील, उपशिक्षक ए .यु. शिंदे, उपशिक्षिका, एन .एस .राऊत तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. अश्विनी गायकवाड मॅडम बिचवे मॅडम यांनी देशभक्तीपर कवायत बसवून घेतले. टाटा बिल्डकॉन इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सर्टिफिकेट गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना मिठाई ,केळी ,बिस्किट इत्यादी अल्पोबार देण्यात आला ,त्यांचा आनंदात सहभागी झालेले शिक्षक व वृंदावन अगदी आनंदी वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.
कार्यकारी संपादक – श्री मनिष मुथा






