
कु. सायली ढेबे यांना राज्यस्तरीय ग्लोबल स्टार 2025 पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र प्रतिनिधी – संदीप काकड
ग्लोबल फौंडेशन व विद्यानिकेतन संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कु. सायली बाळू ढेबे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्यक्षेत्र, कलाक्षेत्र, पत्रकारिता, समाजसेविका,उत्कृष्ट वक्त्या, स्व आत्मपरीक्षण व्याख्याने, अशा अष्टपैलू असलेल्या ग्लोबल स्टार पुरस्कार 2025च्या त्या मानकरी ठरल्या. हा कार्यक्रम सोहळा पुणे येथे सावित्रीबाई सभागृह, गंजपेठ येथे पार पडला, कार्यक्रमाच्या वेळी अनेक थोर व सन्माननीय प्रमुख पाहुण्यांची उपस्तिती लाभली.मा. श्री विजय नाईकल सर (सहाय्यक आयुक्त, कोथरूड वारजे क्षत्रिय कार्यालय ), मा. सौ रुपालीताई चाकणकर (महाराष्ट्र राज्य महिला आयोग )तसेच मा. युवराज बेलदारे (नगरसेवक पुणे महानगरपालिका ),मा. रुपेश टाकळकर (डायरेक्टर जॉयझील इंडिया प्रा.ली.), मा. प्रियांका निकम (पोलीस उपनिरीक्षक ),मा. प्रीती संघवी (समाजसेविका )कार्यक्रमास उपस्तित होत्या.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


